Akole: अकोले तालुक्यातील चोरी करणारी टोळी गजाआड
अकोले | Akole: घरगुती वापराच्या वस्तू, विविध गाड्यांच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या टोळीला राजूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. राजूर परिसरातील हद्दीत घरगुती वापराच्या वस्तू व मोटारसायकल बॅटऱ्या चोरून नेण्याचे घटना वारंवार घडत होत्या. याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक यानी कसून चौकशीचे आदेश दिले होते.
त्यानुसार राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस कॉन्स्टेबल फटांगरे व इतर स्टाफ गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सुदाम सखाराम बादड रा. पाचनई ता. अकोले याने चोरीच्या बॅटऱ्या घरात लपवून ठेवले असल्याची माहिती समजल्याने घराची झडती घेतली असता त्यांच्याकडे चोरीच्या बॅटऱ्या मिळून आल्या. त्यांच्याकडे अधिक चौकशी व विचारपूस केली असता राजूर व परिसरातून पाच जणांनी चोऱ्या केल्याची कबुली दिली.
समीर विठ्ठल भारमल, रा. पाचनई, अजय उर्फ लाला विष्णू भांगरे, दिलीप विष्णू भांगरे, मच्छिंद्र बुधा डोगिरे, मिलिंद भीमा मडके, सर्व रा. राजूर यांना ताब्यात घेऊन विचारपूस करण्यात आली असून चोरी केल्याची कबुली दिली आहे.
त्यांच्याकडून एकूण २ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, नितीन खैरनार व त्यांचे पथकाने केली आहे. अधिक तपास राजूर पोलीस स्टेशनचे अंमलदार करीत आहे.
Web Title: Akole gang of thieves from Akole taluka has gone missing