Home अकोले अकोले तालुक्यातील कोतूळ येथील तीन गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार

अकोले तालुक्यातील कोतूळ येथील तीन गुंडांना जिल्ह्यातून हद्दपार

Akole Kotul Three goons were deported from Ahmednagar

अकोले(Akole): अकोले तालुक्यातील कोतूळ येथील संघटीतपणे हल्ले करून दहशत निर्माण करणारे तीन गुंडांना जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमारसिंह यांनी दीड वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

मोहन सखाराम खरात वय २६, गुलाब भिकाजी खरात वय ३८ व अमोल भिकाजी खरात वय ३० रा. कोतूळ अशी या हद्दपार केलेल्या गुंडांची नावे आहेत. या तीन गुंडांवर आतापर्यंत अनेक प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. अकोले पोलीस ठाण्यात लोकांना मारहाण करणे, दुखापत करणे, दगडफेक करणे, दहशत निर्माण करणे, मालमत्तेचे नुकसान करणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे या तिघांवर दाखल झालेले आहेत.

या तीन गुंडांना अहमदनगर जिल्ह्यासह नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, इगतपुरी तालुका, ठाणे जिल्ह्यातील शहापूर, पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुका या भागांतून १४ जुलैपासून दीड वर्ष हद्दपार केले आहे.

या तीनही गुंडाविरोधात अकोले पोलीस ठाण्याने पोलीस अधीक्षकांकडे हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. त्यानुसार त्यांना १४ जुलैपासून दीड वर्ष हद्दपार केले आहे.

वाचकहो, ‘संगमनेर अकोले न्यूज’ ला व्हाटस अप वर फॉलो करताय ना?… अजून जॉईन केले नसेल तर क्लिक करा -(Sangamner Akole News) आणि मिळवा ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलवर.  

Website Title: Akole Kotul Three goons were deported from Ahmednagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here