Home अकोले अकोले नगरपंचायत निवडणूक उर्वरित 4 प्रभागात हे १३ उमेदवार रिंगणात

अकोले नगरपंचायत निवडणूक उर्वरित 4 प्रभागात हे १३ उमेदवार रिंगणात

Akole Nagarpanchayat Election 4 seats 13 candidate

Akole Nagarpanchayat Election| अकोले: अकोले नगरपंचायतीच्या उर्वरित  ४ प्रभागातील निवडणुकीत आज माघारीच्या शेवट दिवशी २ अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली तर प्रभाग क्र ४ मधील अपक्ष उमेदवार योगेश मुकुंद जोशी यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने येथे चाैरंगी लढत होत आहे तर इतर ११,१३ व १४ प्रभागात भाजपा,राष्ट्रवादी व कॅाग्रेस अशी तिरंगी लढत होणार आहे.आता एकुण ४ प्रभागात  १३ उमेदवार निवडणूक रिंगणात राहीले आहे.

अकोले नगरपंचायतच्या ४ प्रभागातील निवडणुकीच्या दाखल २२ उमेदवारी अर्जाची  छाननी होऊन त्यामध्ये  ५ अर्ज अवैध ठरुन १७ अर्ज वैध रित्या प्राप्त झाले होते यामध्ये पक्षाचे उमेदवारांचे अपक्ष राहिलेले अर्ज मागे झाल्यानंतर आज माघारीच्या शेवट दिवशी प्रभाग क्र ४ मधील अपक्ष उमेदवार दत्ताञय चिमाजी भोईर व प्रभाग क्र १४ तील अपक्ष उमेदवार प्रकाश शंकर नाईकवाडी,यांनी माघार घेतली असल्याने ४ प्रभागात एकुण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात आहे.यावेळी शहरातील प्रमुख गावठाणातील प्रभाग क्र ४ मधून अपक्ष म्हणून योगेश मुकुंद जोशी यांनी माघार न घेतल्याने या प्रभागात भाजपाचे हितेष रामकृष्ण कुंभार,शिवसेनेचे मैड श्रीकांत सुधाकर,व कॅाग्रेसचे तांबोळी फैजान शमसुद्दीन अशी चाैरंगी लढत होत आहे

तर प्रभाग क्र ११ मधून १)वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भारतीय जनता पार्टी) ,२)वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी कॅाग्रेस),३) वनिता रामदास शेटे (भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस)

प्रभाग क्र १३ मधून १)मोहिते जनाबाई नवनाथ (भारतीय जनता पार्टी),२)लोखंडे आरती सुरेश (राष्ट्रवादी कॅाग्रेस),३)कर्णिक अंजली स्वप्निल ( भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस)

प्रभाग क्र १४ मधून १)नवले शरद एकनाथ (भारतीय जनता पार्टी,२) नाईकवाडी राजेद्र यादव ( भारतीय राष्ट्रीय कॅाग्रेस) ,३)डमाळे पांडुरंग बाबुराव (राष्ट्रवादी कॅाग्रेस पार्टी) अशी तिरंगी लढत होत आहे. उमेदवारांना चिन्ह झाल्यानंतर  निवडणूकीतील रंगत वाढणार आहे.

एकूणच मागील १३ वार्डातील निवडणूकीनंतर उर्वरित या चार वार्डातील निवडणुकीचीही रणधुमाळी सुरू झाली आहे.या सर्व वार्डात राष्ट्रवादी-सेना आघाडी , भाजपा व कॅाग्रेस असे तीनही पक्षाचे एकमेकासमोर आव्हान आहे तर ४ नं वार्डात एक अपक्ष म्हणून योगेश जोशी निवडणूक लढवत असुन त्याची उमेदवारी ही ४ प्रभागातील प्रबळ दावेदारी म्हटली जात असुन या वार्डात सर्वानी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.असे असले तरी मुस्लीम समाजाचे मतदान येथे जास्त असून जोशी व तांबोळी यांच्या उमेदवारीचा तोटा कोणाला होणार हे 19 जानेवारीला समजेल.

Web Title: Akole Nagarpanchayat Election 4 seats 13 candidate

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here