Home अकोले अकोले: कळस ग्रामपंचायत विहिरीत आढळल्या १२ मोटारसायकल

अकोले: कळस ग्रामपंचायत विहिरीत आढळल्या १२ मोटारसायकल

अकोले: कळस ग्रामपंचायत विहिरीत आढळल्या १२ मोटारसायकल

अकोले: तालुक्यातील कळस येथील ग्रामपंचायत विहिरीमध्ये तब्बल बारा दुचाकी गाड्या आढळून आल्या असून या गाड्यांचे अनेक भाग गायब आहे. हि घटना आज शनिवारी दुपारी १२ वाजता घडली असून दुपारी उशिरापर्यंत विहिरीतून गाड्या शोधण्याचे व बाहेर काढण्याचे काम चालू होते.

कळस ग्रामपंचायत विहिरीला भरपूर पाणी आहे. दरम्यान गावातील काही तरुणांना या विहिरीतून पाणी काढताना दुचाकी आढळून आली. अधिक तपास केला असता या विहिरीत अनेक मोटारसायकली असल्याचे आढळून आल्याने अकोले पोलिसांना घटनास्थळी धाव घेतली व ग्रामस्थांचा मदतीने या विहिरीतून दुपारी २:३० वाजेपर्यंत सुमारे १२ मोटारसायकली बाहेर काढल्या यात हिरो होंडा पल्सर यासह महागड्या गाड्या होत्या. मात्र यात अनेक गाड्यांचे भाग गायब होते. या चोरीच्या गाड्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर कळसमध्ये विहिरीत आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक तपास अकोले पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करीत आहे.  

पहा बातमीत संगमनेर: गरिबांच्या रोजीरोटीवर बुलडोजर

 Website Title: Akole News 12 motorcycles found in well


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here