यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन जीवनात प्रेरणादायी ठरते- पि.एस.आय.डगळे.
यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन जीवनात प्रेरणादायी ठरते- पि.एस.आय.डगळे.
सर्वोदय खिरविरेत स्नेहसंमेलन व पारीतोषीक वितरण सोहळा संपन्न.
पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – चांगल्या माणसाची संगत आणि यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन आपल्या जीवनात निश्चितच प्रेरणादायी बदल घडवू शकतात. असे प्रतिपादन कसारा पोलीस स्टेशनचे पि.एस.आय. सागर डगळे यांनी केले.
सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता. अकोले ) येथे स्नेहसंमेलन तसेच पारीतोषीक वितरण सोहळा आनंदमय वातावरणात संपन्न झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पि.एस.आय. सागर डगळे व्यासपिठावरुन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष टि.एन. कानवडे हे होते.
या प्रसंगी सहसचिव मिलिंद उमराणी, संचालक तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर, माजी विक्रीकर आयुक्त मारूती डगळे, शालेय समितीचे अध्यक्ष एम.के.बारेकर, इजि. बाळु वाजे, स्कुल कमिटीचे सदस्य दिनेश शहा, मेजर तुकाराम डगळे, ग्रामपंचायतीच्या सरपंच गीताबाई रावते, सदस्य त्रिंबक पराड, दत्तात्रय हाळकुंडे, प्राचार्य अंतुराम सावंत यांसह बहुसंख्य ग्रामस्थ तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक, विद्यार्थि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पि.एस.आय.डगळे पुढे बोलताना म्हणाले कि, प्रामाणिक अभ्यास करून नाव उज्वल करा.शुन्यातुन निर्माण केले आहे. मेहनतीला फळ आहे. आई , वडीलांची पुण्याई कामाला येते. मि ज्या शाळेमुळे, शिक्षकांमुळे मोठा झालो या ऋणातुन मुक्त होण्यासाठी विद्यालयास अध्यावत साऊंड सिस्टिम देण्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सचिव टि. एन. कानवडे यांनी जीवनात खडतर प्रवास जो करतो तो यशस्वी होतो. पाचवीचा पहिला विद्यार्थी उच्च पदावर पोहचतो हा सत्यनिकेतन संस्थेचा अभिमान असल्याचे प्रतिपादन केले. तसेच विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी वसतीगृहाची सोय करण्याचेही त्यांनी सांगितले.
संचालक तथा माजी प्राचार्य प्रकाश टाकळकर यांनी वर्गातील गुण म्हणजे सर्वस्व नसुन,चांगले नागरीक घडावेत. कष्टाने मिळवलेले यश जीवनात महत्वाचे आहे. संधी निर्माण करा. व्यक्त व्हायला शिका. गुणवत्तेला पर्याय नाही असे विचार प्रतिपादन केले.
दिनेश शहा यांनी रोपटयाचे रूपांतर वटवृक्षात झाले याचा अभिमान वाटतो. धाडस केल्याशिवाय यश मिळत नाही. त्यासाठी स्वतःचे अस्तित्व निर्माण करा तेव्हाच जग तुमचा आदर करेल असे मत प्रतिपादन केले.
मेजेर तुकाराम डगळे यांनी कर्तव्य महत्वाचे असुन ज्ञानाचे गाठोडे आयुष्यात कोठेही कमी करणारे नाही.परिस्थितीला सामोरे जाण्याची हिंमत निर्माण करा. कष्ट करा फळ आहेच असे विचार मांडले.
सांस्कृतीक कार्यक्रमांत विदयार्थ्यांनी देशभक्तीपर गीत, समुह नृत्य, नाटीका,विनोद, लावणी, रेकॉर्ड डान्स, शिळ्या बातम्या, बासरी गित इत्यादी कार्यक्रमातुन उपस्थितांचे मने जिंकली.
प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले. यावेळी दिपक पाचपुते व रामदास डगळे यांनी परिक्षण व गुणदानाचे काम केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले.
सांस्कृतीक कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. सचिन लगड, भरत भदाणे यांनी तर पारीतोषीक वितरणाचे दिपक पाचपुते यांनी केले. भरत भदाणे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य अंतुराम सावंत, दिपक पाचपुते, संपत धुमाळ, शशिकांत कुलकर्णी, कविता वाळुंज, भरत भदाणे, नानासाहेब शिंदे, धनंजय लहामगे, भाऊसाहेब कोते, लिपिक भास्कर सदगिर, प्रा.विक्रम आंबरे, प्रा.रामदास डगळे, प्रा. संजय देशमुख, प्रा.एकनाथ डगळे, संगीता भांगरे,सुधिर पराड, पि.के. बेणके, सुभाष बेणके, सुनिल देशमुख यांसह विद्यार्थी आदिंनी परिश्रम घेतले.
Website Title: Sarvoday Vidya Mandir Khirvire ceremony
संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.
आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436
मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा
Get Latest Marathi News, Marathi Batmya Today Live & Marathi News Live from Politics, Sports,Entertainment News, Sangamner Taluka News, Akole Taluka News, Marathi Batmya Live and मराठी बातम्या लाइव from all cities of Maharashtra.
प्रमोटेड बातम्या: