Home अकोले अकोले तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार, उसाच्या फडात लोचके तोडले

अकोले तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर ठार, उसाच्या फडात लोचके तोडले

Akole News Bibatya attack farmer worker death 

अकोले | Akole News: अकोले तालुक्यातील धुमाळवाडी शिवारातील झोळेकर वस्तीवर रविवारी रात्री शेतमजूर संतोष कारभारी गावंडे वय ४५ हे शेतात काम करत असताना बिबट्याने हल्ला चढवत त्यांस ठार केले. बिबट्याने उसात ओढत नेले आणि मान, पोट यांचे लचके तोडत अर्धे खाऊन टाकल्याचे वनपरीक्षेत्रापाल भाग्यश्री पोले यांनी सांगितले.

मयत गावंडे यांच्या चपला व पिशवी शेतातच दिसल्याने जवळच्या उसाच्या शेतात शोध घेतला असता त्यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेने परिसरात दहशत पसरली आहे. या नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची मागणी धुमाळवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

वनपरीक्षेत्रपाल भाग्यश्री पोले वनरक्षक विठ्ठल पारधी, वन कर्मचारी ज्ञानेश्वर कोरडे, दोन पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील प्रणाली धुमाळ यांनी पंचनामा केला.  

Web Title: Akole News Bibatya attack farmer worker death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here