Home क्राईम संगमनेर: शेतात ट्रॅक्टर घातल्याने एकमेकांना लोखंडी गज, काठ्यांनी मारहाण

संगमनेर: शेतात ट्रॅक्टर घातल्याने एकमेकांना लोखंडी गज, काठ्यांनी मारहाण

Crime news Tractor tractors hit each other with iron fences and sticks

संगमनेर | Crime News: संगमनेर तालुक्यातील पठार भागातील जांभूळवाडी (साकुर) शिवारात शनिवारी दुपारी साडे चार वाजेच्या सुमारास शेतात ट्रॅक्टर घातल्याच्या कारणातून एकमेकांना लोखंडी गज व काठ्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात दोन परस्परविरोधी फिर्यादीवरून १८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शेतात ट्रॅक्टर घातल्याच्या वादातून रागाच्या भरात दोन कुटुंबात हाणामारी झाली. याबाबत अशोक भागा थोरात वय २८ रा. जांभूळवाडी याने दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश पोपट थोरात, नितीन रामा खेमनर, शंकर रामा खेमनर, चंदन रामा खेमनर, बाबाजी लहानू खेमनर, राजू भागा खेमनर, पोपट रखमा थोरात सर्व रा, जांभूळवाडी ता. संगमनेर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी फिर्याद सारिका नितीन खेमनर वय २३ रा. जांभूळवाडी यांनी दिली असून त्यावरून भागा नाना थोरात, अशोक भागा थोरात, सोपान  भागा थोरात, बाळू नाना थोरात, प्रवीण बाळू थोरात, यांसह इतर अनोळखी पाच ते सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल सुरेश टकले हे करीत आहे.

Web Title: Crime news Tractor tractors hit each other with iron fences and sticks

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here