Home अकोले अकोले: अकोलेत बारावीच्या विद्यार्थ्याची फाशी घेऊन आत्महत्या

अकोले: अकोलेत बारावीच्या विद्यार्थ्याची फाशी घेऊन आत्महत्या

अकोले: अकोलेत बारावीच्या विद्यार्थ्याची फाशी घेऊन आत्महत्या

अकोले: इयत्ता बारावीमध्ये शिकत असलेल्या सौरभ तात्यासाहेब मंडलिक(वय १८) या विद्यार्थ्यांने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी कि, अकोले शहरातील सारडा पेट्रोल पंपाच्या मागे डॉ. मंडलिक हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर सौरभ याने स्लब च्या हुकाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन जीवन संपविले. इयत्ता बारावीची सुरु असल्याने त्याने ज्या खोलीत आत्महत्या केली तिथे सर्व पुस्तके वह्या नोटस अस्तव्यस्त पडलेल्या होत्या, तर त्या बाजूलाच वडापाव खालेला असावा असे आढळून आले. मॉडर्न हायस्कूल अकोले येथे विज्ञान शाखेत इयत्ता बारावीमध्ये तो शिकत होता. सध्या त्याची परीक्षा सुरु होती.

त्याचे वडील शिक्षक असून चुलते डॉक्टर आहेत. त्याला आई वडील बहिण असून तो अकोल्यात डॉ. मंडलिक यांच्याकडे राहत होता. घरची सर्व मंडळी लग्नासाठी बाहेर गेली होती सौरभ दुपारपासून एकटाच घरी होता तो दुपारपासून फोन उचलत नव्हता रात्री नऊ वाजता हि मंडळी घरी आल्यावर हि बाब लक्षात आली. याबाबत अकोले पोलिसांना समजताच प्रभारी पोलीस निरीक्षक काळे हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केल्यानंतर सौरभचा मृतदेह अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.   

Website Title: akole news Suicides by students of Class XII

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here