Home अकोले अकोले: दुकानाला आग लागून जळून खाक

अकोले: दुकानाला आग लागून जळून खाक

अकोले: दुकानाला आग लागून जळून खाक

अकोले: अकोले शहरातील बाजारपेठेतील एक दुकान जळून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. नागरिकांच्या प्रसंगावधनाने आग आटोक्यात आली अन्यथा बाजूलाच असणारी दुकानाची रांगच भस्मसात झाली असती.

याबाबत सविस्तर माहिती अशी, शनिमंदिर रस्त्यावरील देविदास सासवडे यांच्या मालकीची टपरीवजा दुकान असून हे दुकान दीपक जंगम यांच्याकडे भाड्याने आहे. आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास शहरातील या दुकानाला अचानक आग लागली. सकाळी पायी फिरायला जाणार्या नागरिकांच्या हि बाब लक्षात आली. सर्वांनी मदत कार्य सुरु केले. पाण्यासाठी सर्वच पळापळ करत असल्याचे दिसून आले. महिला तर आपल्या स्कार्प च्या साह्याने बाजूच्या दुकानामधला माल बाहेर काढत मदत करीत. अर्ध्या तासानंतर अगस्ती कारखान्याच्या अग्निशामक दलाने हि आग आटोक्यात आणली. शहरातील नागरिकांनी यावेळी मदत कार्य केल्याने बाजूच्या दुकानातील सर्व माल बाहेर काढला. यावेळी बाळासाहेब कोकणे गणेश कानवडे उपस्थित होते.

पहा बातमी : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Website Title: akole news The shop was burnt


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here