Home अकोले अकोले: सी एम चषकच्या सामने नी फुलली कळसची मैदाने व युवकांमध्ये उत्साह...

अकोले: सी एम चषकच्या सामने नी फुलली कळसची मैदाने व युवकांमध्ये उत्साह संचारला

अकोले: सी एम चषकच्या सामने नी फुलली कळसची मैदाने व युवकांमध्ये उत्साह संचारला

सी एम चषकच्या सामने नी फुलली कळसची मैदाने व युवकांमध्ये उत्साह संचारला अन मुख्यमंत्री यांच्या संकल्पनेला दाद दिली.
            अकोले तालुका भारतीय जनता युवा मोर्चा च्या वतीने सी एम चषक स्पर्धाच्या खो खो, हॉलीबॉल व गीत गायन स्पर्धा कळसेश्वर क्रीडांगणा वर आयोजित करण्यात आल्या होत्या. 
           खो खो च्या स्पर्धा मध्ये दहा पुरुष व दोन महिला संघांनी भाग घेतला या खोखो चे सामने अतिशय रंगतदार व चुरशीचे झाले. महिलांच्या अटीतटीच्या सामन्यात वारंघुशी संघावर पिंपळगाव नाकविंदा संघाने मात केली व जिल्ह्याचा स्पर्धेसाठी निवड झाली तर पुरुषांच्या संघाची अंतिम सामना बाकी राहिला.
       फुटबॉल चे सामने रात्रीच्या वेळी व कडक्याच्या थंडीत खूपच रंगले तालुक्यातील सात संघांनी यात भाग घेतला सर्व सामने अतिशय अटीतटीचे झाले एम के व्ही राजूर आणी शिवालय कोतुळ यांच्यातील अंतिम सामना तर थरारक झाला यात एम के व्ही राजूर ने विजेतेपद मिळवले.
      गायन स्पर्धाच्या निमित्ताने अनेक कलाकार यांनी आपली कला सादर केली खूपच सुंदर आणी उत्कृष्ट असे गीत स्पर्धा झाल्या त्यामध्ये शिवशाहीर रेवण देशमुख यांनी पुरुष गटात तर अश्विनी मंडलिक यांनी महिला गटात विजेते पद मिळवले.
       यावेळी भाजपचे जीप सदस्य डॉ किरण लहामटे, तालुका अध्यक्ष सिताराम भांगरे, संगमनेर साखर कारखाना चे माजी संचालक सिताराम वाकचौरे, काँग्रेस चे तालुका सरचिटणीस अरुण वाकचौरे, कळसेश्वर विद्यालय चे मुख्याध्यापक शिवाजी बिबवे, ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे आदी उपस्थित होते.
     यावेळी खोखो पंच म्हणून बाळासाहेब नाईकवाडी, रामदास कासार, संतोष वाबळे, विनोद तारू, रोहित बर्वे तर हॉलीबॉल साठी भाऊसाहेब वाकचौरे, अण्णासाहेब ढगे, काळे सर, तर गायन स्पर्धासाठी परीक्षक म्हणून  गणेश महाराज वाकचौरे व अरुण महाराज शिर्के यांनी काम पाहिले 
या स्पर्धा यशस्वीतेसाठी भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, युवा मोर्चा अध्यक्ष ईश्वर वाकचौरे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कानवडे, पोपट चौधरी, सुनील उगले, सुशांत वाकचौरे, जालिंदर बोडके, ज्ञानेश पुंडे, यांनी विशेष प्रयत्न केले.

पहा बातमी : मेंढ्या चारण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू

Website Title: akole C M Chashak in Kalas


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here