Home अकोले अकोले: पिंपळदरी येथे शेतीच्या वादातून डाळिंबाची 1100 झाडे उपटली

अकोले: पिंपळदरी येथे शेतीच्या वादातून डाळिंबाची 1100 झाडे उपटली

अकोले: पिंपळदरी येथे शेतीच्या वादातून डाळिंबाची 1100 झाडे उपटली

अकोले: अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथे शेतीच्या वादातून शोभा रंधे यांच्या शेतातील सुमारे 1100 डाळिंबाची झाडे उपटून टाकण्यात आली. याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील पोलीस ठाण्यात दोघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  शोभा आत्माराम रंधे वय 40, रा.पिंपळदरी या पतीसह शेती करतात. त्यांचे पती आत्माराम जनलक्ष्मी पतसंस्थेत नोकरीस आहेत. सुमारे एक वर्षापूर्वी रंधे यांनी हर्षवर्धन संजय रंधे यांच्याकडून एक हेक्टर शेती विकत घेतली होती. या जमिनीत त्यांनी 1200 डाळिंबाची झाडे लावली. या जमिनीबाबत उषा पोपट जाधव रा.कौठे, केशरबाई शिवाजी जोरी रा.भोजदरी यांनी तहसीलदार व प्रांत यांच्याकडे खरेदीची नोंद न होण्याबाबत दावा दाखल केला होता. त्या दाव्याचा निकाल रंधे यांच्या बाजूने लागला होता. परंतु तरीही जाधव व जोरी यांच्याकडून शेती करताना आत्माराम यांना त्रास दिला जात होता.

दि. 9 मार्चच्या रात्री उषा जाधव, केशरबाई जोरी ट्रॅक्टरचालक यांनी ट्रॅक्टरला साखळी लावून रंधे यांच्या शेतातील 1100 डाळिंबाची झाडे उपटून टाकली. हा प्रकार संजय ज्ञानेश्वर रंधे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी फोन करून आत्माराम यांना झाडी उपटल्याची कल्पना दिली. त्यानंतर रंधे कुटूंबियांनी शेतात धाव घेतली परंतु तोपर्यंत 1100 झाडे उपटल्याने रंधे कुटूंबियांचे दोन लाख रुपयांचे नुकसान झालेले आहे.

याप्रकरणी शोभा रंधे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून केसरबाई जोरी व उषा जाधव गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: Akole Planting 1100 trees of pomegranate


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here