Home अकोले राजूर: शिक्षक देशद्रोही आहे, असे बोलणार्या प्रा. नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाईची...

राजूर: शिक्षक देशद्रोही आहे, असे बोलणार्या प्रा. नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

राजूर: शिक्षक देशद्रोही आहे,  असे बोलणार्या प्रा. नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाईची मागणी

शिक्षक देशद्रोही आहे, अशी व्हिडिओ क्लिप व्हायरल करणार्‍या प्रा. नामदेव जाधव यांच्यावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी निवेदन राजूर प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीने राजूर पोलिसांना दिले आहे.

या निवेदनात म्हंटले आहे की,  सर्व जिल्हा परिषद शिक्षक देशद्रोही आहेत, तसेच काम न करता पगार घेतात, हे हमाल आहेत असे गैरविश्वासू व आक्षेपार्ह विधान केल्यामुळे समस्त शिक्षक वर्गामध्ये संतापाची भावना, नाराजीचा सूर निर्माण झालेला आहे. असे अपमानास्पद वक्तव्य आम्ही सर्व प्राथमिक, माध्यमिक शिक्षक कदापि सहन करणार नाही. शिक्षकांच्या भावना दुखावणार्‍या नामदेव जाधव यांना भा.दं.वि. नुसार कठोर शिक्षा व्हावी. तसेच नामदेव जाधव यांनी मीडियाच्या माध्यमातून व स्वत:समोर येऊन शिक्षकांची जाहीर माफी मागावी असे सांगण्यात आले आहे.

या मागणीचे निवेदन देण्यासाठी अनेक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच चिंधु भांगरे, नामदेव बारामते, सुधीर बोर्‍हाडे, विष्णू चौधरी, प्रल्हाद कोंडार, संजय बोरसे, दत्तात्रय लांघी, सुनील मेचकर, सुनील सूर्यवंशी, अर्जुन तळपाडे, बिना सावळे, श्रीमती धादवड आदिंसह शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Website Title: Rajur Shikshak Demand Namdevrao Jadhav


Latest News: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here