Home अकोले शब्द हे माणसाची वेदना: संपादक सुधिर लंके इतिमाग हस्तलिखीताचे प्रकाशन समारंभ.

शब्द हे माणसाची वेदना: संपादक सुधिर लंके इतिमाग हस्तलिखीताचे प्रकाशन समारंभ.

शब्द हे माणसाची वेदना संपादक सुधिर लंके.

” इतिमाग” हस्तलिखीताचे प्रकाशन समारंभ.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -इतिहासाचा मागोवा घेणे म्हणजे इतिमाग असून त्यातील शब्द हे वेद आहेत, इतिहास आहेत त्याचप्रमाणे शब्द हे माणसाची वेदना आहे.
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथे उपक्रमशिल शिक्षक दिपक पाचपुते यांच्या संकल्पनेतुन मराठी व इतिहास विषयाअंतर्गत नाविण्यपूर्ण उपक्रम ” इतिमाग” या इयत्ता ८वी व९वीच्या विद्यार्थ्यांच्या हस्तलिखीताचे प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अहमदनगर लोकमतचे मुख्य संपादक सुधिर लंके व्यासपिठावरून बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष सत्यनिकेतन संस्थेचे संचालक प्रकाश टाकळकर हे होते.
यावेळी लोकमत कार्यालयातील व्यवस्थापक नरेंद्र अंकुश, जाहीरात व्यवस्थापक रविंद्र जरे, बायफचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन साठे, माजी विक्रीकर उपायुक्त मारूती डगळे, पत्रकार हेमंत आवारी, प्रकाश महाले, अण्णासाहेब चौधरी, कृतीशील शिक्षक दिपक बोऱ्हाडे, नरेंद्र राठोड यांसह प्राचार्य अंतुराम सावंत, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थि उपस्थित होते.
संपादक सुधिर लंके पुढे बोलताना म्हणाले कि, ज्ञानाला प्रचंड महत्व असुन ज्ञानाचा उगम यंत्र करू शकत नाही ते आपण करू शकतो. म्हणूनच इतिमाग हे कौतुकास्पद आहे.ज्ञानबाजारात विकत घेता येत नाही. शिकतो त्या तुनच ज्ञान मिळते.ज्ञान शोधायचे असते त्यासाठी उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावतात. गावाला अनेक वाटा असतात त्या दिशा देतात.सगळयांना सोबत घेऊन चला. शिक्षण हे आनंदाने घ्या. तेव्हाच धमाल होईल.एखादया न माहीत गोष्टींचा शोध घेणे म्हणजे शिक्षण आहे.हस्तलिखीतातील नावे सुवर्ण अक्षरात लिहीली गेली. तेव्हा तुम्ही इतिहास पुरूष आहात. त्यासाठी तंत्रज्ञान अवगत करा. समाजाच्या गरजा ओळखा. इंग्रजीचा बाहू करू नका. त्यातुन तुम्ही कलाकार, दिग्दर्शक, लेखक, कवी व्हाल. असेही प्रतिपादन श्री. लंके यांनी केले. यासाठी द्रोणाचार्य, एकलव्य यांचे उदा. देत आईकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश टाकळकर यांनी विद्यार्थ्यांना अभिप्रेत आहे तेच दिले. कवि कविता शिकवतो हा उपक्रम नावीन्यपुर्ण आहे. त्यासाठी विदयार्थ्यांना त्यांच्या भाषेत क्यक्त होऊ दया. ति संधी या उपक्रमातून मिळते. क्षमतांचा वापर करा. यासाठी सत्यनिकेतन संस्था, बायफ संस्था कटिबद्ध राहील असे मत प्रतिपादीत केले.
व्यवस्थापक नरेंद्र अंकुश यांनी शब्द रत्न असुन, शब्द जिवनाला आकार देतात. चांगले रत्न या उपक्रमातुन निर्माण झाल्याचा अभिमान व्यक्त केला.
बायफचे जितीन साठे यांनी शाळा माझे कुटुंब असुन सुख, दुःखात सहभागी होण्याचा आनंद व्यक्त करत चांगल्या विचारातून दिशा मिळते. त्यामुळे आदिवासी भागातील शाळांचे नंदनवन करु. हा उपक्रम मुलांना चालना देणारा असून कलाकार राहिले तर मुले घडतील असे मत प्रतिपादीत केले. तसेच मुलांनी स्वतः बनवलेल्या सत्कार बुक्यांचे भरभरून कौतुक केले.
उपायुक्त मारुती डगळे यांनी प्रगतीच्या वाटा निवडा. त्यावरून जाताना अडथळे दुर करा. वाटा विकासातुन,स्पर्धा परीक्षातुन प्रगती करा. असे प्रतिपादन केले.
यावेळी विद्यार्थीनी ऋतुजा डगळे व कावेरी गोडे यांनीही मनोगत व्यक्त केले.
प्रमुख मान्यवरांचा सत्कार या भागातील मुख्य पिक काळ भात व वरई देऊन करण्यात आला.
उपक्रमशिल शिक्षक दिपक पाचपुते यांच्या कार्याचा गौरव करत त्यांचाही मान्यवरांनी सत्कार केला.
उपस्थित मान्यवरांचे स्वागत प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिपक पाचपुते यांनी केले.
कविता वाळुंज यांनी सुत्रसंचालन केले तर प्रा. सचिन लगड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य अंतुराम सावंत, दिपक पाचपुते, शशिकांत कुलकर्णि, संपत धुमाळ, कविता वाळुंज, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, लिपिक भास्कर सदगिर, विक्रम आंबरे, रामदास डगळे, सचिन लगड, एकनाथ डगळे, योगेश शिंदे, संजय देशमुख, पि.के. बेणके, सुभाष बेणके, विद्यार्थि आदिंनी परीश्रम घेतले.

Website Title:Sudhir lanke word is the pain of man


Latest: Sangamner NewsAkole News, And Entertainment News


अहमदनगर जिल्ह्यातील No-1 अप्प: आजच Google Play Store ला जाऊन डाउनलोड करा – Sangamner Akole News.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here