Home अकोले अकोले एस.टी.डेपो कंडक्टरची माळशेज घाटात उडी मारून आत्महत्या- Suicide

अकोले एस.टी.डेपो कंडक्टरची माळशेज घाटात उडी मारून आत्महत्या- Suicide

Akole ST Depot conductor commits suicide by jumping in Malshej Ghat

Ahmednagar | Akole | अकोले: अकोले तालुक्यातून हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे. अकोले एस.टी.डेपोचे वाहक गणपत मारुती इदे ( वय ४४ रा.भंडारदरा) यांनी माळशेज घाटात उडी मारून आत्महत्या (Suicide) केली आहे. या घटनने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत समजलेली माहिती अशी कि अकोलेच्या एस.टी.डेपोत वाहक (कंडंक्टर)म्हणून कार्यरत असलेले गणपत मारुती इदे हे काल अकोले कल्याण बस घेऊन गेले होते कल्याणला मुक्कामी असताना ते रात्री घरी येऊन परत ड्युटी ला जात असताना त्यांनी माळशेज घाट येथे रस्त्याचे काम चालु असल्याने ट्राफिक जाम असल्याने गाडी थांबली असताना गाडीतून उतरून दरीत उडी घेऊन  आत्महत्या केली आहे. आत्महत्या नेमकी कोणत्या कारणाने केली हे अद्याप कळालेले नाही. मात्र ड्यूटीवर ताण तणाव होता का? कि घरगुती तणावात होता यावर चर्चा सुरु आहे.

कोविड संकटकाळ व नंतर संपाचा कालावधी संपुन नुकतेच महामंडळ व कर्मचारी कामावर रूजू झालेले होते अश्या काळातच वाहकाने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे .संप काळात वाहक- चालकांची आर्थिक स्थिती बिघडलेली होती. नुकतीच संपकाळानंतर एस.टी.महामंडळ व कर्मचारी रूळावर येत आहे.

Web Title: Akole ST Depot conductor commits suicide by jumping in Malshej Ghat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here