संगमनेर खळबळजनक घटना: मांचीहिल शिवारात निमगाव जाळीच्या तरुणाचा मृतदेह आढळला
Sangamner | संगमनेर: संगमनेर तालुक्यातून खळबळजनक घटना समोर आली आहे. मांचीहिल शिवारात तरुणाचा मृतदेह (Dead Body) आढळून आला आहे. मांचीहिल शिवारात मंगळवारी सकाळी भाऊसाहेब दत्तात्रय तळोले (वय 35) या तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेमकी मृत्यू कशामुळे याचा तपास पोलीस करीत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवारी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास मांची शिवारातील हॉटेल पुरोहित जवळ वनविभागाच्या क्षेत्रात एक मृतदेह असल्याची माहिती पोलिस पाटील दिलीप डेंगळे यांना फोनवरुन मिळाली होती. त्यामुळे घटनेचे गांभिर्य ओळखून दिलीप डेंगळे यांनी घटनेची माहिती पोलिसांना देऊन ते घटनास्थळी दाखल झाले. यावेळी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक खंडीझोड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी भाऊसाहेब तळोले याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेर येथिल कॉटेज रुग्णालयात पाठविला आहे. तळोले याचा मृत्यू नेमकी कशामुळे झाला ? की त्याचा कुणी घातपात केला याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.
Web Title: Dead body of a youth from Nimgaon Jali was found in Manchi Hill Shivara