Home अकोले अकोले: पोलीस हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ, अधिकाऱ्यावर आरोप

अकोले: पोलीस हवालदाराची गोळी झाडून आत्महत्या, सुसाईड नोटने खळबळ, अधिकाऱ्यावर आरोप

Akole Suicide News: भाऊसाहेब आघाव (राजूर पोलीस ठाणे) यांनी स्वतः ला गोळी घालून आत्महत्या.

Akole Suicide of a police constable, excitement over the suicide note

अकोले: पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव (राजूर पोलीस ठाणे) यांनी स्वतः ला गोळी घालून आत्महत्या केली ही घटना शनिवारी सकाळी घडली. त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. यामध्ये त्यांनी सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे व सहायक पोलीस उप निरीक्षक प्रकाश रामभाऊ निमसे, शिवाजी फुंदे व एका महिला पोलिसाचे नावे आत्महत्या कारणीभूत धरावे असे म्हंटले आहे. या घटनेने अहमदनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.  

पोलीस हवालदार भाऊसाहेब आघाव यांनी आत्महत्या करण्या पुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ही सुसाईड नोट त्यांनी पत्रकार व हितचिंतक यांना व्हाट्सअप्प द्व्यारे पाठवली असुन सदर चिठ्ठी मध्ये आघाव यांनी म्हटले आहे की, मी पोहे. काँ २५९ भाऊसाहेब दगडु आघाव नेमणूक पोलीस मुख्यालय अहमदनगर सत्य प्रतिवर लिहून देतो की मी श्री अजित दादा पवार यांचे अकोला दौरा बंदोबस्त करीता गेलो असता येथे मला सपोनी साबळे राजुर पो.स्टे भेटले व म्हणाले की तुम्ही शेंडी Op ला असताना सर्व दोन नंबरचे धंदे बंद केल्यामुळे माझे ५ लाखाचे नुकसान झाले मी ASI  निमसे याना हाताशी धरून व म पो.कॉ राऊत यांच्या मदतीने तुमचे विरुद्द गुन्हा दाखल केला तेंव्हापासून पैसे चालु झाले आहे तुम्ही १० लाख रुपये द्या तुम्हाला मी या गुन्ह्यातून सोडवतो तेव्हा मी त्याना म्हणालो १० लाख रुपये कशाचे तेव्हा ते म्हणाले की माझे ५ लाख हा गुन्हा दाखल करण्यासाठी AS I निमसे यांना ३ लाख व राऊत यांनी मपो कॉ राऊत हिस गुन्हा मागे घेण्याशी तयार केले म्हणुन २ लाख असे १० लाख व तुमची विभागीय चौकशी चालु आहे त्यातुन बाहेर काढणे साठी डी इ काम पाहणारेशिवाजी फुंदे भाऊसो यांना एक लाख रुपये द्या त्यावर मी म्हणालो माझे कडे इतके पैसे नाहीत व मी निघुन गेलो नंतर माझा चौकशी अहवाल आले वर मला फुंदे सो यांनी बोलावून सांगीतले तुमचा चौकशी अहवाल आला आहे मी तुम्हाला यातुन सुखरूप बाहेर काढतो तुम्ही साबळे सो यांनी सांगितले प्रमाणे करून टाका तेव्हा मी त्यांना म्हणालो माझ्याकडे एव्हडे पैसे नाहीत मग ते म्हणाले मग भोगा तुम्ही असे म्हणल्यावर मी निघुन गेलो नंतर मला SP सो यांनी वॉर करीता बोलावले तेव्हा मी सर्व काही मा s p सो यांना सांगीतले तेव्हा त्यानी काही एक प्रतिक्रिया के दिली नाही त्यामुळे मी पुर्णपणे हाताश झालेले आज रोजी स्वःताला संपवत आहे माझ्या मरणास सपोनी साबळे सो ASI निमसे मपोकॉ राऊत व शिवाजी फुंदे हे जबाबदार आहेत आपला विश्वासु

अशा प्रकारची सुसाईड नोट प्राप्त झालेने पोलीस खात्यात खळबळ उडाली असुन मयत हवालदार आघाव यांचे मृत्युस कारणीभुत असलेल्यांना अटक झाल्याशिवाय व त्यांचे मृत्युस कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असे नातेवाईकांनी सांगितले असून  पोलीस प्रशासन काय ? भुमीका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: Akole Suicide of a police constable, excitement over the suicide note

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here