Home अहमदनगर अहमदनगर ब्रेकिंग: महिलेचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

अहमदनगर ब्रेकिंग: महिलेचा दगडाने ठेचलेला मृतदेह आढळल्याने खळबळ

Kopargaon | Ahmednagar: महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह (Woman Dead body) आढळून आल्याने एकच खळबळ. 

Dead Body body of a woman crushed by a stone was found

कोपरगाव: कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे एका ४० वर्षीय महिलेचा दगडाने ठेचलेल्या अवस्थेत संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

सदर  महिलेला एक अज्ञात इसम ओढत असतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून सदर महिलेचा खून (Murder) झाला असल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, कोपरगाव तालुक्यातील शिंगणापूर येथे रेल्वेस्टेशन जवळ असलेल्या काशिनाथ लोणारी कॉम्प्लेक्स या ठिकाणी एक बेवारस महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या मृतदेहाजवळ ठिकठिकाणी रक्ता सांडलेले दिसून येत होते. तसेच मृतदेहा जवळ दगड पडलेले असल्याने हा घातपात असल्याचा संशय निर्माण होत असून शहर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पंचनामा केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

Web Title: Dead Body body of a woman crushed by a stone was found

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here