Home अकोले अकोले: अभिनव शिक्षण संस्थेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन

अकोले: अभिनव शिक्षण संस्थेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन

Akole Summer Camp in abhinav shikshan sanstha 1

अभिनव शिक्षण संस्थेमध्ये उन्हाळी शिबिराचे आयोजन

अकोले :सहा वर्षापुढील  विद्यार्थ्यांना  उन्हाळ्याच्या सुट्टीचा आनंददायी उपयोग करून देण्यासाठी पालकांच्या आग्रहास्तव   अभिनव शिक्षण संस्थेच्या शारीरिक शिक्षण व क्रीडा विभागामार्फत  अभिनव संकुलातील व संकुला बाहेरील शिक्षण  घेत असलेल्या मुलांसाठी   दिनांक १५ एप्रिल ते ३० एप्रिल या कालावधीत  विद्यालयात उन्हाळी शिबिराचे आयोजन केलेले   आहे.  . त्यामध्ये सहभागी विद्यार्थ्यांना  कमीत कमी वेळात जास्तीत जास्त खेळांचे सखोल तंत्रशुद्ध प्रशिक्षण तसेच मार्गदर्शन मिळणार आहे. या शिबिरात  .योग,.रायफल शूटिंग,.हॉर्स राइडिंग,.रिक्रिएशनल गेम्स,फंडामेंटल गेम्स, ब्रेन डेव्हलपिंग गेम्स,.मिनी मॅरेथॉन,.सेल्फ डिफेन्स,फायर कॅम्प,.ट्रेकिंग( गिर्यारोहण ), फिटनेस ड्रील्स,.टीम बिल्ड गेम्स या उपक्रमांचा सहभाग असणार आहे. त्यासाठी प्रशस्त रायफल शूटिंग रेंज, प्रशस्त हॉर्स रायडिंग कोर्ट, तसेच अनुभवी व तज्ञ मार्गदर्शक.उपलब्ध असल्यामुळे अत्यंत सुरक्षित व तंत्रशुध्द शिबिरात सहभागी झालेल्या  पाल्यामध्ये स्पर्धात्मक खेळांची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न या शिबिरामध्ये केला जाणार आहे. तसेच काही मनोरंजनात्मक क्रीडा प्रकारांचा देखील समावेश यात आहे. सदर शिबिराचे शुल्क केवळ १२०० रुपये असून शिबिरार्थीला  टी-शर्ट व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. सकाळी सात ते बारा या वेळेत होणाऱ्या  या शिबिरात अकोले तालुक्यातील पालकांचा उत्तम प्रतिसाद असल्याची माहिती क्रीडा विभाग प्रमुख स्वप्नील शेटे यांनी दिली. 

Website Title: Akole Summer Camp in abhinav shikshan sanstha