Home अकोले राजूर: खाजगी रुग्णालयात झालेल्या चुकीच्या उपचारामुळे एक १८ वर्षीय युवती अस्वस्थ

राजूर: खाजगी रुग्णालयात झालेल्या चुकीच्या उपचारामुळे एक १८ वर्षीय युवती अस्वस्थ

राजूर: खाजगी रुग्णालयात झालेल्या चुकीच्या उपचारामुळे एक १८ वर्षीय युवती अस्वस्थ

राजूर प्रतिनिधी: भंडारदरा येथील एका खाजगी रुग्णालयात झालेल्या चुकीच्या उपचारामुळे एक १८ वर्षीय युवती अस्वस्थ झाली असुन तिला पुढील उपचारासठी घोटी येथील एका खाजगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविल्याची खळबळ जनक घटना घडली आहे .
     या बाबत सविस्तर वृत्त असे की आशा दिनकर जाधव ( वय १८ ) ही युवती नासिक जिल्ह्यातील खडकेद ( इंदोरे ) येथील असुन तिने नुकतीच १२ वीची परीक्षा देऊन सुट्टीसाठी चिंचोंडी ..ता अकोले येथे तिच्या मावशीकडे आली होती . दरम्यान तिला थंडीताप आल्यामुळे तिच्या मावशीने तिला भंडारदरा ( शेंडी ) येथील चैतन्य हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता तेथील डॉ . संदीप पर्बत यांनी मुलीला ताप असताना देखील तिला इंजेक्शन दिले . व त्या मुलीला अधिक त्रास जाणवु लागला , असे मुलीचे वडील दिनकर शिवराम जाधव यांनी आरोप केला असुन संबधित दवाखाण्यात नातेवाईक , ग्रामस्थ जमा झाले . याबाबत डॉ.पर्बत यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी या आरोपाचे खंडन करुन आपली काही चुकी नसल्याचे व संघटनेकडे तक्रार करण्याची धमकी दिली . मात्र काही वेळाने शेंडी गावचे संरपंच दिलीप भांगरे यांनी मध्यस्थी करुन रुग्ण युवतीला पुढील उपचारासाठी हलविण्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला . संबधीत डॉक्टर विषयी स्थानिकांच्या अनेक तक्रारी असुन चुकीच्या  उपचारामुळे अनेक रुग्णांना गंभीर स्वरुपाचा त्रास झाला आहे . मात्र यातुन काहीही बोध न घेता उलट संघटनेच्या दबाव तत्रांचा गैरवापर करत असल्याचेच समोर येत आहे . तरी संबधीत डॉक्टर बाबत सखोल चौकशी होऊन कार्यवाही होणे गरजेचे असल्याचे गोगाशेट भांगरे यांनी सांगितले . तर घोटी येथे उपचार घेत असलेल्या युवतीच्या प्रकृतीची फोनवरुन तिच्या वडीलांकडे विचारपुस केली असता प्रकृतीत काहीसा सुधार झाल्याचे सांगितले . 
   भंडारदरा हे आदिवासी भागातील नवगाव डांगाणाचे प्रमुख ठिकाण असुन अनेक आजारी रुग्ण भंडारदरा येथे उपचारासाठी येत असतात . आदिवासी भागातील निरक्षर जनतेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत अनेक डॉक्ट त्यांच्याकडुन अव्वाच्या सव्वा रक्कम वसुल करतात . रुग्णावर जर उपचार करुनही फरक पडत नसेल तर कमीशनच्या मोबदल्यात डॉक्टर सांगतील त्याच दवाखाण्यात नेण्याची सक्ती रुग्णाच्या नातेवाईंकावर केली जाते . भंडारदरा परीसरात असणारे दवाखाने परवाणेधारक आहेत का ? याचीही सखोल चौकशीची मागणी आता जोर धरु लागली आहे .

Website Title: Bhandardara woman is unwell due to the treatment

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here