Home अकोले अकोले: देवठाणचे ग्रामसेवक निलंबीत

अकोले: देवठाणचे ग्रामसेवक निलंबीत

देवठाणचे ग्रामसेवक निलंबीत

देवठाण: – अकोले तालुक्यातील देवठाण ग्रामपंचायतीने ग्रामसेवक अरुण जेजुरकर यांना दैनंदिन कामकाजात गैरवर्तन, हलगर्जीपणा करणे, कर्तवांचे पालन न करणे अशा  प्रकाराचा ठपका ठेऊन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकरी विश्वजित माने यांनी निलंबनाचा आदेश काढला आहे.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

जिल्हा परिषदेने दि. ५ सप्टेंबर २०१८ रोजी जावक क्रमांक सा.प्र.वी. २ / ग्रा.पं.३/९३८/२०१८ या पत्राव्दारे निलंबन आदेश काढला. आदेशात म्हटले आहे की,ग्रामसेवक अरुण जेजुरीकर हे देवठाण ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक म्हणुन कार्यरत असतांना कर्तव्यांचे पालन केले नाही, म्हणुन महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम १९९६/३ चा भंग केला असल्याने ही कारवाई केली आहे, असे निलंबिनाच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे.

बऱ्याच तक्रारी गेल्यानंतर दौलत नवले हे नवीन ग्रामसेवक म्हणुन देवठाणाला हजर झाले. दप्तरही मागणी करुनही दत्पर देईनात म्हणुन तत्कालीन सरपंच भागुबाई जोरवर व विद्यमान सरपंच रोहिणी सोनवणे यांनी नवीन ग्रामसेवकाने चार्ज देण्यात यावा अशी मागणी जिल्हा परिषद व गटविकास अधिकारी यांच्याकडे केली. ग्रामसभेत ठराव घेऊन जेजुरीकर यांच्यावर कारवारईची मागणी केली होती. या सर्व प्रकाराची चौकशी करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे उपमुख्य -कार्यकारी अधिकारी प्रशांत शिर्के यांनी काढले होते. चौकशी पुर्णे झाल्यानंतर सविस्तर अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने यांना देण्यात आला अहवाल प्राप्त झाल्यानंतर तसेच ग्रामसेवक जेजुरीकर यांची बाजु ऐकुन घेतल्यानंतर त्यांच्यावर वरील आरोप निश्चित करुन निलंबित करण्यात आले आहे.


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here