Home अहमदनगर जि.प.शाळेतील मुलांना स्वराज्य प्रतिष्ठान व क्रांती सेनेचा मदतीचा हात…

जि.प.शाळेतील मुलांना स्वराज्य प्रतिष्ठान व क्रांती सेनेचा मदतीचा हात…

जि.प.शाळेतील मुलांना स्वराज्य प्रतिष्ठान व क्रांती सेनेचा मदतीचा हात…

क्रांती सेनेचे सरचिटणीस नितीन देशमुख यांच्या संकल्पनेतून गणवेश वाटप….
वाळुज महानगर: सर्व शिक्षा अभियान अंतर्गत महाराष्ट्रातील जि.प.शाळेत शिकणाऱ्या इ.1 ली ते ७ वी च्या  एस.सी.आणि एस टी.संवर्गातील विध्यार्थ्यांना व सर्व संवर्गातील मुलींना शासन गणवेश देत असते.परंतु खुल्या व ओबीसी प्रवर्गातील मुलांना ह्या गणवेश योजनेचा लाभ दिला जात नाही .गेल्या चार वर्षापासून याबाबत स्वराज्य प्रतिष्ठान व क्रांती सेनेच्या वतीने शासन स्तरावर पाठपुरवठा सुरु आहे परंतु अद्यापही शासनाला पाझर फुटला नाही.
एकीकडे शासन  समानतेच्या गप्पा मारते आणि एकीकडे शासनच  जातीआधारावर गरीबांमध्ये भेद करते  हि अत्यंत वेदनादायी बाब आहे.  जि.प.शाळेत शिकणारा मुलगा हा कोणत्या हि जाती धर्माचा असो तो गरीब आहे म्हणूनच तिथे शिकत असतो.हे मुले म्हणजे ग्रामीण भागातील गोर गरीब, शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी यांची मुले  आहेत.अशा मुलांना शासन  गणवेश नाकारून त्यांच्या स्वाभिमानाला लाथच मारत आहे.आज महाराष्ट्रच्या जवळपास 10 ते १२ हजार शाळामधून असे जवळ लाखो विध्यार्थी ह्या शासनाच्या चुकीच्या धोरणाचे बळी ठरत आहेत.ह्या सगळ्या महाराष्ट्रातील जि.प.शाळांनाचा डाटा आम्ही जमा केला आहे.ह्या सर्व विध्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत हि योजना सर्वाना लागू होत नाही तो पर्यंत स्वराज्य प्रतिष्ठान व क्रांती सेनेच्या वतीने लढा दिला जाईल व तो पर्यंत लोक सहभागातून ह्या सर्व विध्यार्थ्यांना गणवेश उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू.
ह्या #उपक्रमाचाच एक भाग म्हणून आज दि.11 सप्टेबर १८ रोजी वाळूज एम.आय.डी.सी.भागातील रांजणगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील 1 ली ते 7 वीच्या ओपन ओबीसी मुस्लीम समाजातील मुलांना स्वराज्य प्रतिष्ठान च्या वतीने लोकसहभागातून गणवेश वाटप करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रांजणगाव चे सरपंच मोहिनीराज धनवटे,सहायक पोलीस निरीक्षक विजय घीवरे,जिप. सदस्या उषाताई हिवाळे,प.स.सदस्य दीपक बडे,ग्रामपंचायत सदस्य अशोक शेजूळ,दिलीप तौर,सुभाष सोनवणे,ज्ञानेश्वर वाकचौरे,माजी.सरपंच भरत,गरड,सामाजिक कार्यकर्ते,अशोक कानडे,शाळेच्या कर्तव्यदक्ष मु.अ.ज्योती ताई भालेराव,शिक्षक सुनिल ठोंबळ,क्रांतीसेनचे राजू शेरे ,औदुंबर देवडकर,संतोष घोडके,नागेश झोडपे ,पत्रकार मित्र संतोष उगले,संतोष बोटवे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.ह्या कार्यक्रमचे सूत्रसंचालन कृष्णा दाभाडे यांनी केले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुबोध झडते,निलेश सोनवणे,सागर लाड,अभिजित ठोंबळ,पप्पू बनसोडे,बालाजी तेलंगे,शुभम नवले मयूर गोसावी,वैभव पवार ,गणेश भुतेकर,मयूर मोरे,अक्षय चौरे ,राहुल काळे,महेश ढवळे,विष्णू नेमटे,योगेश खंडागळे,पवन पाटील,कृष्णा नखाते,अभी तातडे इत्यादी अनेक स्वराज्य प्रतिष्ठान चे पदाधिकारी उपस्थित होते.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक कराLEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here