Home अकोले अकोले: स्वाईन फ्लूच्या तिसऱ्या बळीने अकोले हादरले

अकोले: स्वाईन फ्लूच्या तिसऱ्या बळीने अकोले हादरले

स्वाईन फ्लूच्या तिसऱ्या बळीने अकोले हादरले

अकोले: तालुक्यात स्वाईन फ्लूचा फैलाव झपाट्याने होत असून काल तांबोळ येथील युवकाचा मृत्यू स्वाईन फ्लूने झाल्याने मृतांची संख्या आता तीनवर पोहचली आहे. सुरेश नामदेव हरनामे वय ३५ हा आजारी स्थितीमध्ये काल नाशिक येथील सिव्हील हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना दगावला. जिल्ह्यातील बळींची संख्या आता १६ वर गेली आहे. त्यापूर्वी त्याने अकोले येथे दोन खासगी हॉस्पिटल मध्ये उपचार घेतले. मात्र त्याची प्रकृती सुधारली नाही. त्यानंतर हरनामे यांना नासिक सिव्हील हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेले त्यांना स्वाईन फ्लू ची लक्षणे सांगून रुग्ण उशिरा दाखल झाल्याने अगतिकता व्यक्त केली. दरम्यान अनेक रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याचा अहवाल तालुका आरोग्य विभागास अद्याप प्राप्त झालेला नाही. यापूर्वी शकीला खालील शेख, समशेरपूर याचे हि स्वाईन फ्लू ने निधन झाले.तर लक्ष्मीबाई गोरख गोडसे, मोग्रस यांचाही स्वाईन फ्लू ने घात केला आहे. तर मच्छिंद्र संपत कोरडे , लिंगदेव या रुग्णाचे पुणे वास्तव्यास असताना स्वाईन फ्लू ने निधन झाले. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

You May Also LikeJacqueline Fernandez bikini images and Jacqueline Fernandez sexy images

दरम्यान तालुका अधिकारी यांच्याशी संपर्क साधाला असता नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन त्यांनी केले आहे.शिवाय साबणाने व स्वच्छ पाण्याने हात धुवावेत, पौष्टीक व हिरव्या पाले भाज्यांचा आहार घ्यावा, सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,भरपूर पाणी प्यावे अशाही खबरदारीच्या सूचना त्यांनी केल्या.  


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here