Home अकोले Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी  १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Akole: अकोले तालुक्यात गुरुवारी  १२ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

Akole Taluka 12 persons Conrona Positive

अकोले | Akole: अकोले शहरात ०३, इंदोरी ०५ ,राजुर, सुगाव,गणोरे, कुंभेफळ प्रत्येकी एक अशी तालुक्यात १२ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या २९७९ इतकी झाली आहे.

गुरुवारी तालुक्यात घेण्यात आलेल्या ११७ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये १० व्यक्तीचा, खासगी प्रयोगशाळेतील अहवालात ०२ व्यक्ती असा एकुण १२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.

गुरुवारी अकोले ग्रामीण रुग्णालय येथून ४० व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.

गुरुवारी ॲन्टीजन टेस्टमध्ये गणोरे येथील १५ वर्षीय तरुण, राजुर येथील ३४ वर्षीय महीला, सुगाव बु येथील ६६ वर्षीय महीला, अकोले शहरातील ५० वर्षीय पुरूष, शेकईवाडी येथील ८१ वर्षीय पुरूष, इंदोरी येथील ४२ वर्षीय महीला, ४७ वर्षीय महीला, ३२ वर्षीय महीला, १८ वर्षीय तरुणी, १४ वर्षीय तरुणी, अश्या १० व्यक्ती तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात शहरातील ४० वर्षीय महीला, कुंभेफळ येथील ५४ वर्षीय महीला अश्या ०२ व्यक्तीसह आज १२ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या २९७९ वर पोहोचली आहे.

Web Title: Akole Taluka 12 persons Conrona Positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here