Home अहमदनगर रेखा जरे हत्या प्रकरण: पत्रकार बाळ ज. बोठे व भिंगार दिवे यांनी...

रेखा जरे हत्या प्रकरण: पत्रकार बाळ ज. बोठे व भिंगार दिवे यांनी दिली खुनाची सुपारी

Rekha Jare murder Case Baal J Bothe Given Supaari 

अहमदनगर: अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज रेखा जरे प्रकरणी माहिती दिली आहे. यानुसार पत्रकार बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी रेखा जरे यांच्या हत्येची सुपारी दिली होती.

सोमवार दिनांक ३० नोव्हेंबर रोजी राष्ट्रवादी कार्यकर्त्या व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची नगर पुणे रोडवर जातेगाव फाट्यानजीक गळा चिरून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पोलीस हे मुख्य सूत्रधाराच्या शोधात होते.

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषद मध्ये या गुन्ह्याचा उलगडा केला आहे. या पाच आरोपी व्यतिरिक्त बाळ ज. बोठे हे सामील असल्याचे उघड झाले आहे. तो फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

पत्रकार बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे यांनी हत्येची सुपारी इतर आरोपींना दिल्याचे सांगितले आहे. या सूत्रधाराचा शोध घेण्याचे काम पथके करीत आहेत.  

Web Title: Rekha Jare murder Case Baal J Bothe Given Supaari 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here