Home संगमनेर कृषी व कामगार विधेयक मागे घेण्यासाठी संगमनेरात आंदोलन

कृषी व कामगार विधेयक मागे घेण्यासाठी संगमनेरात आंदोलन

Agitations in Sangamner to withdraw Agriculture and Labor Bill

संगमनेर | Sangamner: केंद्र सरकारने नवे कृषी व कामगार विधेयक मंजूर केलेले आहे या विरोधात कॉंग्रेसच्या वतीने एल्गार पुकारण्यात आला आहे.  कृषी व कामगार विधेयक मागे घ्यावे यासाठी गुरुवारी संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे आंदोलन सुरु केले.

यावेळी कॉंग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कृषी विधेयक मागे घेण्यसाठी दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाला कॉंग्रसच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.

या आंदोलनात नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कॉंग्रेस तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ , पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, उप नगराध्यक्ष राजेंद्र सांगळे, नगरसेवक हिरालाल पगडाल, शेतकरी नेते अरुण कान्होरे आदी नेते सहभागी झाले होते.   

Web Title: Agitations in Sangamner to withdraw Agriculture and Labor Bill

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here