Home अकोले अकोले तालुक्यात पाचशे टप्पा पार आज १७ करोनाबाधित

अकोले तालुक्यात पाचशे टप्पा पार आज १७ करोनाबाधित

Akole taluka 17 corona infected today

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज नवीन १७ रुग्णांची भर पडल्याने पाचशेचा टप्पा पार करत एकूण करोनाबाधितांची संख्या ५०७ इतकी झाली आहे. आज कोतूळ येथे सर्वाधिक आठ रुग्ण आढळून आले आहेत. तसेच शेकईवाडी, पाडाळणे, धामणगाव पाट, गणोरे, लाहित खुर्द, धामणगाव आवारी, बेलापूर येथे रुग्ण आढळले आहेत.

आज १७ करोनाबाधित आढळून आले यामध्ये धामणगाव आवारी येथे ७० वर्षीय वृद्ध, शहरालगत शेकईवाडी येथे  ३६ व ५७ वर्षीय महिला, लाहित खुर्द ५६ वर्षीय पुरुष, ४६ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे ४० वर्षीय महिला, १० वर्षीय मुलगी, १८,४२,४० वर्षीय पुरुष, धामणगाव पाट २७ वर्षीय महिला, पाडाळणे येथे ७० वर्षीय वृद्ध, गणोरे येथे २२ वर्षीय तरुणी तसेच खासगी अहवालात कोतूळ येथील ३ व बेलापूर येथील एकाचा समावेश आहे.  तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५०७ इतकी झाली आहे. 

Web Title: Akole taluka 17 corona infected today

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here