Home क्राईम Rahuri: राहुरीच्या एका तरुण शिक्षिकेवर अत्याचार, आरोपी फरार  

Rahuri: राहुरीच्या एका तरुण शिक्षिकेवर अत्याचार, आरोपी फरार  

Rahuri Atrocities register a young Teacher

राहुरी | Rahuri: राहुरी येथे राहणाऱ्या एका तरुण (३० वर्षीय) शिक्षिकेवर बदनामी करण्याच्या धमक्या देत तिच्यावर घरात वेळोवेळी बळजबरीने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.

धीरज रामराव नाईकवाडी रा. अहमदपूर जि. लातूर असे या आरोपीचे नाव आहे. त्याने तुझा भाऊ, आई, बहिण यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तसेच बदनामी करेल अशा धमक्या देत अत्याचार केला.

हा प्रकार २०११ ते सप्टेंबर २०१९ पर्यंत घडला आहे. राहुरी भागात एका घरात तसेच अहमदपूर येते राहत्या घरी, पैठण तालुक्यात भाड्याच्या घरात तर शिर्डी येथे एका लॉजवर बळजबरीने धामाकावून अत्याचार केला होता.

या घटनेबाबत राहुरी पोलिसांत या शिक्षिकेने फिर्याद दिली आहे. आरोपी धीरज रामराव नाईकवाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच फिर्यादीत या शिक्षिकेकडून शिक्षक बँकेचा सात लाख रुपयाचा धनादेश बळजबरीने घेतला आहे असे म्हंटले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आरोपी अद्याप पसार झाला आहे. सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल या घटनेचा तपास करीत आहे.

Web Title: Rahuri Atrocities register a young Teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here