Home अकोले अकोले तालुक्यात १७ जण बाधित तर नगरमध्ये करोनाचा कहर

अकोले तालुक्यात १७ जण बाधित तर नगरमध्ये करोनाचा कहर

Akole Taluka 17 corona Positive ahmednagar increased positive 

अकोले | Akole: अकोले तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालात १७ जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३४४९ इतकी झाली आहे.

शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार अकोले येथील ३६ वर्षीय पुरुष, ४९,३२,३२ वर्षीय महिला, केळी येथील १७ वर्षीय मुलगा, पिंपळदरी येथील ३० वर्षीय पुरुष, राजूर येथील ५३ व ५३ वर्षीय पुरुष, ४७ वर्षीय महिला, मधुबन कॉलनी नवलेवाडी येथे ३१ वर्षीय पुरुष, शेटे मळा येथे ५५ वर्षीय पुरुष, धामणगाव येथे ७१ वर्षीय पुरुष, फाळके वस्ती अकोले येथे ३४ वर्षीय महिला, जाचकवाडी येथे ३८ वर्षीय महिला, गणोरे येथे ४५ वर्षीय महिला, कोतूळ येथे ३९ व १८ वर्षीय महिला असे १७ जण बाधित आढळून आले आहेत.

दरम्यान जिल्ह्यात दिवसेंदिवस करोनाचा कहर वाढत असून शुक्रवारी एकाच दिवसात तब्बल ६६० करोना रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये एकट्या नगर शहरातील २३८ जणांचा समावेश आहे. त्यामुळे उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३१२० झाली आहे.

Web Title: Akole Taluka 17 corona Positive ahmednagar increased positive 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here