अकोले तालुक्यात ३० करोनाबाधितांची वाढ, एकाच घरातील ७ जण बाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात ३० जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या ३३९७ इतकी झाली आहे. समशेरपूर येथील एकाच घरातील सात जण बाधित आढळून आले आहेत.
सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार गावठाण धुमाळवाडी येथे ६५ वर्षीय महिला, हिवरगाव आंबरे येथे ६९ वर्षीय पुरुष, खानापूर येथे ६६ वर्षीय पुरुष, शेकईवाडी येथे ७२,३१,४८ वर्षीय पुरुष, २१ वर्षीय महिला, गणोरे येथे ५९ वर्षीय पुरुष, शिंदेवाडी गणोरे येथे ५६ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथे ५३ वर्षीय पुरुष, सातेवाडी येथे १७ वर्षीय मुलगा, लिंगदेव येथे ६५ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे २६,४९,७५ वर्षीय पुरुष, अकोले येथे २०,२७ व ५३ वर्षीय पुरुष, १६ वर्षीय मुलगा, धुमाळवाडी येथे ३४ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ३० वर्षीय महिला, रेडे येथे २४ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय महिला, समशेरपूर येथे ६ व ९ वर्षीय मुलगी, १३ व १६ वर्षीय मुले, ३० व ४७ वर्षीय महिला, ४० वर्षीय पुरुष असे ३० जण बाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka Corona Report one home 7 Positive