Home अहमदनगर संगमनेर: घारगाव येथील हॉटेल मालकाचा खून करणारा आरोपी अटकेत

संगमनेर: घारगाव येथील हॉटेल मालकाचा खून करणारा आरोपी अटकेत

Sangamner Accused of killing hotel owner in Ghargaon arrested

अहमदनगर: खून आणि दरोड्याच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी जेरबंद करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. श्रीगोंदा येथील सुरेगाव शिवारातून अटक केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी माहिती दिली.  

याबाबत अधिक माहिती अशी की, घारगाव येथील हॉटेल मालक आशिष चंद्रकांत कानडे रा. कळंब यांचा हॉटेलमध्ये चोरीच्या हेतूने खून करण्यात आला होता. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात हॉटेलमध्ये झोपलेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे हॉटेलचे पाठीमागील जाळीची साखळी व कुलूप तोडून कानडे यांचा खून करून हॉटेलमधील ४० हजार रुपयांची रोख रक्कम व दारूच्या बाटल्या दरोडा टाकून चोरून नेल्या होत्या. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आला होता. यासाठी पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करण्यात आली होती.  पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत सगड्या उंबऱ्या काळे रा. सुरेगाव यास मोठ्या शितापीने अटक केली. त्यांला पोलिसाच्या खाक्या दाखविताच त्याने नावे सांगितली.या दरोड्यातील फरार असणारा मिथुन उंबऱ्या काळे रा. सुरेगाव तालुका श्रीगोंदा याला तो घरी येणार असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्याला सापळा लावून अटक करण्यात आली. यापूर्वी त्याने एक खून केला होता. अशा दोन खुनातील आरोपी फरार असणारा मिथुन उंबऱ्या काळे यास अटक करण्यात आली आहे.

Web Title: Sangamner Accused of killing hotel owner in Ghargaon arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here