अकोले तालुक्यात कोरोना रुग्णवाढ सुपरफास्ट
अकोले | Akole Taluka Corona: अकोले तालुक्यात कोरोना रुग्णवाढीचा वेग कमी होताना दिसत नाही. तालुक्याच्या बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार तब्बल ४६८ रुग्ण नवीन बाधित आढळून आले आहेत. यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
अकोले तालुक्यात आत्तापर्यंत एकूण बाधितांची संख्या ९२९७ इतकी झाली आहे. मंगळवारी २४८, बुधवारी १५५ आणि आज गुरुवारी पुन्हा ४६८ बाधितांची संख्या वाढली आहे. जिल्ह्यात तीन दिवसांपासून बाधितांचा आकडा खाली येत असताना तालुक्यात मात्र तो वाढताना दिसत आहे.
तालुक्यामध्ये कडक निर्बंध लागू केलेले आहे. निर्बंध मोडणाऱ्यांसाठी दंड आकाराला जात आहे. नागरिक हे सकाळी सात ते अकरा या दरम्यान भाजीपाला खरेदी करण्याच्या नावाखाली गर्दी करताना आढळून येत आहे. तसेच आंबे फळांचे सीजन चालू आहे. जागोजागी आंबे विक्रीसाठी दुकाने लावण्यात आलेली दिसून येत आहे. या दुकांनामध्ये आंबे खरेदीसाठी मोठी झुंबड होत आहे असेच जर सुरु राहिले तर कोरोना तरी कसा आटोक्यात येणार असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.
तसेच ग्रामीण भागात देखील कोरोना फोफावत चालला आहे. ग्रामीण भागांत कडक निर्बंध आणून कोरोना नियंत्रित करणे गरजेचे आहे. घरात राहाल तर सुखात राहाल.
गुरुवारी प्राप्त झालेले ४६८ अहवालाची गावानुसार संख्या शुक्रवारी सकाळी प्रदर्शित करण्यात येईल.
Web Title: Akole taluka corona today Suparfast