Home अकोले कळस ता अकोले येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत पालक मेळावा, कलादालनचे उदघाटन

कळस ता अकोले येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत पालक मेळावा, कलादालनचे उदघाटन

कळस ता अकोले येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत पालक मेळावा, कलादालनचे उदघाटन

कळस: ता.अकोले येथील जिल्हा परिषद केंद्र शाळेत पालक मेळावा, आपत्ती व्यवस्थापन दिन, व गोवर व रुबेला लसीकरण मार्गदर्शन व विद्यार्थी कलादालन चे उदघाटन करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन दिनाच्या निमित्ताने आयोजित पालक मेळाव्याच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोन्याबापू वाकचौरे हे होते यावेळी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन वाकचौरे, उपाध्यक्ष राजेंद्र गवांदे, डी. टी वाकचौरे, ग्राम पंचायत सदस्य रावसाहेब वाकचौरे, यादव वाकचौरे, शांताराम वाकचौरे, नामदेव निसाळ, रामदास वाकचौरे, पुंजा वाकचौरे प्रकाश बिबवे, सुरेश वाकचौरे हे उपस्थित होते.
यावेळी कराटे स्पर्धेत बारामती येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत कु. वैष्णवी भानुदास चौधरी हिने कांस्यपदक मिळवलेबद्दल व तिला मार्गदर्शन करणाऱ्या श्री शेटे सर यांचा सत्कार करण्यात आला. 
शाळेचे मुख्याध्यापक श्री एकनाथ दिघे यांनी नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विषयी माहिती दिली तर आरोग्यसेविक सौ अलका जाधव यांनी गोवर व रुबेला लसीकरण कार्यक्रम विषयी मार्गदर्शन केले.
यावेळी सोन्याबापू वाकचौरे यांनी पालक मेळाव्याला पालक उपस्थित राहत नाही यामुळं खंत व्यक्त केली  तर हभप अरुण महाराज शिर्के यांनी शाळेत शिक्षणात सुधारणा झाली पाहिजे तर प्रमिला ढगे यांनी पालकांनी शिक्षकांना सहकार्य केले पाहिजे असे मत व्यक्त केले
यावेळी विद्यार्थीनी बनविलेल्या विविध वस्तू चे कलादालन चे उदघाटन भाऊसाहेब वाकचौरे यांचे हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्तविक स्मिता धनवटे व सुत्रसंचलन शिवाजी काळे यांनी केले आभार संपत भोर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक जयदेव चौधरी, बबूताई वाकचौरे, सखाराम मेसे, नंदा कातोरे, सुवर्णा जाधव, स्वप्ना गुरव, चैताली लोंढे यांनी प्रयत्न केले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here