Home संगमनेर संगमनेर: घरफोडी करून चोरट्यांनी लांबविले तीन तोळे सोने

संगमनेर: घरफोडी करून चोरट्यांनी लांबविले तीन तोळे सोने

संगमनेर: घरफोडी करून चोरट्यांनी लांबविले तीन तोळे सोने

संगमनेर: तालुक्यातील जवळे कडलग येथील रामदास नारायण लांडगे यांच्या घराच्या दरवाजाच्या कटवनीच्या सहाय्याने कडी कोंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी शोकेस मधील तीन तोळे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केल्याची घटना गुरुवार दिनांक ११ ऑक्टोबर पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली. एकूण साठ हजार रुपये किमतीचे हे दागिने होते.

You May Also LikeSalman Khan upcoming movies 2018 and 2019 

याबाबत तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि, जवळे कडलग या ठिकाणी रामदास लांडगे हे शेतकरी आपल्या कुटुंबासमवेत राहत आहे. बुधवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता जेवण करून सर्व जण झोपले होते. अचानक गुरुवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास लांडगे यांना घरामध्ये काहीतरी उचकापाचक झाल्याचा आवाज आला. त्यामुळे ते झोपेतून जागे झाले आणि त्याच वेळी दोघे जण दरवाजातून पळून जाताना दिसले. त्यांनी घरात पहिले असता तर सामानाची उचकापाचक व शोकेसचे दरवाजे उघडलेले होते त्यामुळे ते घाबरून गेले. शोकेस मध्ये पहिले असता सोन्याचे दोन तोळे गंथन, एक तोळा सोन्याचे मंगळसूत्र असा ऐवज या चोरट्यांनी पळवून नेला. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल केला गेला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहे.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here