Home अकोले अकोले: माजी मंत्री पिचड यांची ईडी मार्फत चौकशी करा – डॉ किरण...

अकोले: माजी मंत्री पिचड यांची ईडी मार्फत चौकशी करा – डॉ किरण लहामटे

अकोले: माजी मंत्री पिचड यांची ईडी मार्फत चौकशी करा – डॉ किरण लहामटे

अकोले: माजी मंत्री पिचड यांनी पदाचा गैरवापर केला असून त्यांची ईडी मार्फत चौकशी करा अन्यथा न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार असे जि.प. सदस्य डॉ किरण लहामटे यांनी सांगितले.
        अकोले तहसील कार्यालयासमोर माजी मंत्री मधुकर पिचड यांनी स्वतः च्या दुसऱ्या बिगर आदिवासी पत्नीला आपले अधिकाराचा गैरवापर करून हिंदू महादेव कोळी जातीचा दाखल मिळवून त्याचे आधारे गोरगरीब आदिवासी बांधवांची जमीन खरेदी केल्या याची चौकशी व्हावी या मागणी साठी डॉ किरण लहामटे यांनी आज सकाळी लाक्षणिक उपोषण केले.
       यावेळी भाजप जिप गटनेते जालिंदर वाकचौरे,शिवाजीराजे धुमाळ, भाजप चे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, माजी उपसभापती यमाजी लहामटे, पंस सदस्य दत्ता देशमुख, मारुती लांघी, आदिवासी आघाडी चे जिल्हाध्यक्ष राजेंद्र शेळके, मारुती लांघी, वाळू भवारी, पोपट चौधरी बजरंग दलाचे भाऊसाहेब चव्हाण, मनसे चे तालुकाध्यक्ष दत्ता नवले  वाळीबा धोंगडे, राजेंद्र लहामगे आदीनी भेट दिली
         माजी मंत्री पिचड यांनी मंत्रीपदाचा दुरुपयोग करू आदिवासी समाजामध्ये घुसखोरी केली असून याबाबद  डॉ लहामटे यांनी गेली सात महिन्यापासून  सातत्याने आवाज उठवला असून राज्यपाल, मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री आदिवासी सचिव यांना वेळोवेळी निवेदने देऊन याची चौकशी झाली पाहिजे साठी पाठपुरावा केला मात्र सरकार दरबारी धीम्या गतीने काम करीत आहे
      माजी मंत्री मधुकर पिचड यांनी आपली दुसरी पत्नी हिला खोट्या कागदपत्रे च्या आधारे भिवंडी प्रांत कार्यालयातून आदिवासी जातीचा बोगस दाखला मिळवला व त्या आधारे शहापूर, भिवंडी तालुक्यातील गोरगरीब जनतेच्या जमिनी कवडीमोल भावाने विकत घेतल्या आहेत . यामध्ये पिचड यांनी मंत्रीपदाचा दुरूपयोग केला आहे. आदिवासी समाजाचा मासिह असलेचा दावा करणाऱ्या पिचड यांनी आदिवासी समाजावर अन्याय केला आहे इतरांना आदिवासीत घुसखोरी करण्यावरून कांगावा करण्याऱ्या पिचड यांनीच आदिवासी समाजात घुसखोरी केली आहे
           पिचड यांनी आदिवासी जातीचे जे खोटे दाखले मिळवले व त्याआधारे ज्या आदिवासी समाजाचे  जमिनी घेतल्या याची चौकशी करण्यात यावी असेही लहामटे यांनी म्हटले आहे.
         यावेळी भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, धनंजय संत, माणिक देशमुख, अंकुश वैद्य, जालिंदर बोडके, प्रकाश लहामटे, डॉ अविनाश कानवडे, सूर्यभान दातीर, शैलेश फटांगरे, संदीप रसाळ, ज्ञानेश पुंडे, आदी उपस्थित होते.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here