Home अकोले अकोले: उच्च विचारसरणी  राहणीमान मात्र साधे हेच गांधी विचार- प्राचार्य, अंतुराम सावंत

अकोले: उच्च विचारसरणी  राहणीमान मात्र साधे हेच गांधी विचार- प्राचार्य, अंतुराम सावंत

उच्च विचारसरणी  राहणीमान मात्र साधे हेच गांधी विचार- प्राचार्य, अंतुराम सावंत.

सर्वोदय खिरविरेत महात्मा गांधी व लालबहादुरशास्त्री जयंती साजरी.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी -राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लालबहादुर शास्त्री यांचे बरोबर जे लोक होते त्यांचे विचार खरोखरच चांगले बनले.जीवन जगत असताना ज्यांची उच्च विचारसरणी व साधे राहणीमान असते हेच खरे गांधी विचार असल्याचे प्रतिपादन प्राचार्य अंतुराम सावंत यांनी केले.
सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे(ता.अकोले) येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व देशाचे माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत व्यासपिठावरून बोलत होते.
याप्रसंगी विदयालयाचे जेष्ठ शिक्षक शशिकांत कुलकर्णि, दिपक पाचपुते, संपत धुमाळ, कविता वाळुंज, भरत भदाणे, नानासाहेब शिंदे, भाऊसाहेब कोते, धनंजय लहामगे, लिपिक भास्कर सदगिर, प्रा. रामदास डगळे, प्रा.विक्रम आंबरे, प्रा. सचिन लगड, प्रा.एकनाथ डगळे, संगिता भांगरे,सुनिल देशमुख, पि.के. बेणके, स्वरा आरोटे यांसह विद्यार्थि उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य श्री. सावंत यांनी कै.रा.वि. पाटणकर,कै. बापुसाहेब शेंडे, कै. सावित्रीबाई मदन यांचे विचारांचे दाखले दिले. ज्या माणसांना मोठेपणा आल्यावर गर्व चढत नाही, अपमान झाला तरी ते रागावत नाहीत, क्रोधी बनले तरी बोलण्यात वाईट प्रवृत्ती निर्माण होत नाही वास्तवात दुनियेत अशी माणसे खऱ्या अर्थाने श्रेष्ठ बनतात. म्हणून गांधीजी महात्मा ठरले. असेही मत प्राचार्य सावंत यांनी प्रतिपादन केले.
यावेळी दिपक पाचपुते यांनी अमेरीकेत राष्ट्रपती भवनासमोर महात्मा गांधींचा पुतळा असल्याने हा देशाचा सर्वात मोठा गौरव आहे. गल्लीत काम केले तर दिल्ली दुर नाही.जीवनात अपयश आले तर तो खरा शेवट नसतो तर ती नव्या यशाची सुरुवात असते. दुःखाला दुर सारून प्रयत्न करा हेच खरे जीवन होय असे मत प्रतिपादन केले.
आजच्या या दिवसाच्या निमित्ताने स्वतःचे घर, परीसर स्वच्छ ठेवण्याची शपथ घ्या. असेही श्री. पाचपुते यांनी प्रबोधन केले.
विदयार्थ्यांपैकी पायल बेणके व रूपाली आवारी यांनी आपल्या मनोगतातुन समाज विघातक परिस्थितीवर मात करून सत्य, अहिंसा या मार्गाचा अवलंब करण्याचे विचार व्यक्त केले. तसेच
स्वच्छता पाळा रोग पळवा, स्वच्छ भारत समृद्ध भारत, एक कदम स्वच्छतेकडे, माझा गाव सुंदर गाव, व्यसनापासून दुर रहा यांसारख्या घोषणा देत गावातुन प्रभातफेरी काढण्यात आली.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.विक्रम आंबरे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here