Home संगमनेर संगमनेर: घरातील फरशी अचानक तापल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमनेर: घरातील फरशी अचानक तापल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण

संगमनेर: घरातील फरशी अचानक तापल्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण

वडगाव पान: संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील नागरिक सुभाष थोरात यांच्या घरातील फरशी अचानक तापल्याने परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सुभाष थोरात यांच्या घरी तापलेली फरशी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दी वाढू लागली आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या अफवा पसरवू लागल्या आहेत.

You May Also LikeYeh Hai Mohabbatein News Actress Neeru Agarwal Dies

संगमनेर तालुक्यातील सुभाष थोरात यांच्या राहत्या घरातील फरशी गेली तीन दिवसांपासून अचानक तापू लागल्याने परिसरात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. फरशी तपान्यामागचे नेमके कारण सहाजू न शकल्याने त्यांनी हि बाब त्वरित महसूल महसूल विभागास कळविली. तहसीलदार साहेबराव सोनवणे, सामानापुराचे मंडलाधिकारी पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सदोष वीजवाहक तारांच्या बिघाडामुळे घरातील फरशी तापू लागली असावी असे महसूल विभागाचे म्हणणे आहे. तर परिसरातील नागरिक वेगळीच चर्चा करत आहे. तीन दिवसांपासून फरशी तापण्याचे नेमके कारण सहाजू शकले नाही. तहसीलदार साहेबराव सोनवणे यांनी सांगितले की घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. कदाचित वीजवाहक तारांचा दोष असू शकतो. लोकांनी अफवावरती विश्वास ठेऊ नये.   


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here