Home अकोले अकोले: प्रयोगवन व गडवाट परीवाराकडून सर्वोदय विद्यालयास मोफत सायकल वाटप.

अकोले: प्रयोगवन व गडवाट परीवाराकडून सर्वोदय विद्यालयास मोफत सायकल वाटप.

अकोले: प्रयोगवन व गडवाट परीवाराकडून सर्वोदय विद्यालयास मोफत सायकल वाटप.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देता देता एकदिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. या उक्तीप्रमाणे प्रयोगवन व गडवाट परिवाराकडून खिरविरे (ता.अकोले ) येथील सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास दहा सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी प्रयोगवन परीवाराचे अध्यक्ष सत्तार दादा शेख, केळी रूम्हणवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच भरत मेंगाळ, संदिप दराडे, संदेश साळुंके, बाळासाहेब फोडसे, हरूनभाई शेख यांसह विद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. दुरवरून पायी चालत येणाऱ्या गरीब होतकरू विदयार्थ्यांना या सायकलींचा उपयोग व्हावा
या उद्देशाने विदयालयात सायकल बँक तयार करण्यात आली आहे.
या सर्व दहा सायकली दुरवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत.वर्षाच्या शेवटी या विद्यार्थ्यांनी सर्व सायकली विद्यालयात जमा करायच्या त्या पुढील वर्षी पुन्हा दुसऱ्या विद्यार्थ्यांना वर्षभर वापरायला दयायच्या अशा प्रकारे नियोजन करण्यात आले आहे.
या कौतुकास्पद उपक्रमास विद्यालयाचे कला शिक्षक भाऊसाहेब कोते यांनी पाठपुरावा केला तसेच यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
यापुढेही विद्यालयास येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करण्यास तयार असल्याचे प्रयोगवन व गडवाट परीवाराच्या सदस्यांनी आश्वासन दिले.
या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर चांगलाच आनंद निर्माण झाला आहे.
या स्तुत्य उपक्रमामुळे प्रयोगवन व गडवाट परीवाराचे तसेच मार्गदर्शन शिक्षक भाऊसाहेब कोते यांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव  टि. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, विश्वस्त प्रकाश शहा, माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, सर्व संचालक मंडळ याचबरोबर विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजचा संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here