Home अकोले Akole: राजूर येथे एक तर गणोरे येथे दोन करोना पॉझिटिव्ह

Akole: राजूर येथे एक तर गणोरे येथे दोन करोना पॉझिटिव्ह

Akole Taluka Rajur one and Ganore two corona positive

अकोले | Akole: आज प्राप्त झालेल्या अहवालात तीन जन करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामध्ये राजूर एकाचा तर गणोरे येथील दोघांचा समावेश आहे. तालुक्याची एकूण करोना बाधितांची संख्या ३२०७ इतकी झाली आहे.

आज प्राप्त झालेल्या अहवालात राजूर येथील ५३ वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर गणोरे येथील ४७ वर्षीय पुरुष तर ४४ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहे.

जिल्ह्यात करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना  जिल्हा प्रशासनाने  केले असून यासाठी कडक निर्बंध लादण्यात आले आहे. जिल्हाधीकार्यांनी जिल्ह्यात कलम १४४ १५ मार्चपर्यंत लागू केला आहे. यामध्ये पाच पेक्षा जास्त व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई आहे. अत्यावश्यक सेवा वगळता रात्री १० ते सकाळी ५ या कालावधीत संचारबंदी राहील. विवाह कार्यक्रम यामध्ये जास्तीत जास्त ५० व्यक्तींचा समावेश असेल. प्रत्येक व्यक्तीला मास्कचा वापर व सामाजिक अंतर राखणे बंधनकारक राहील.

Web Title: Akole Taluka Rajur one and Ganore two corona positive

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here