अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सहा करोनाबाधित आढळून आले आहेत. आज लिंगदेव, चितळवेढे, नवलेवाडी, धामणगाव आवारी येथे बाधित आढळून आले आहेत. तालुक्याची करोनाबाधितांची संख्या २१७१ वर पोहोचली आहे.
आज प्राप्त झालेल्या अहवालात लिंगदेव येथे ५५ वर्षीय पुरुष, चितळवेढे येथे २० वर्षीय तरुण, १७ वर्षीय मुलगा, ८७ वर्षीय पुरुष, नवलेवाडी येथे ५८ वर्षीय पुरुष, धामणगाव आवारी येथे ५२ वर्षीय पुरुष असे सहा जण बाधित आढळून आले आहेत. तालुक्यात बाधितांची संख्या कमी होत चालली आहे.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Akole taluka six corona infected