पिक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण करावेत: जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले
संगमनेर: जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे नुकसान झाले. पिकांच्या पंचानाम्यातील त्रुटींमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी पिक नुकसानीचे पंचनामे गुणवत्तापूर्ण पूर्ण करावेत याची काळजी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केल्या आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी रविवारी संगमनेर तालुक्यातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. यावेळी त्यांनी चंदनापुरी व नांदूर खंदरमाळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तलाठी कृषी सहायक व ग्रामसेवक यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे जलद करावे, पंचनामे करताना कोणतीही त्रुटी राहणार नाही याची दक्षता घ्यावी. नुकसानग्रस्त पिकांची भरपाई योग्य पद्धतीने मिळावी यासाठी पंचनामे गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे. अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, तहसीलदार अमोल निकम, तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.
See: Latest Entertainment News, Ahmednagar News, and Latest Marathi News Live
Web Title: Punchnama of crop loss should be made quality Rajendra Bhosale