Home पाथर्डी बिबट्याने मुल झोपेत असतानाच नेले उचलून, मुलाचा मृत्यू

बिबट्याने मुल झोपेत असतानाच नेले उचलून, मुलाचा मृत्यू

Pathardi bibatya attack on a child

पाथर्डी: शहराजवळील माणिक दौंडी रोडलगत केळवंडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडली. पाथर्डी तालुक्यात एकाच आठवड्यात दोन मुलांचा मृत्यू झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

सक्षम गणेश आठरे असे मयत मुलाचे नाव आहे. सक्षम हा नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री घराच्या पडवीत झोपला होता. रविवारी पहाटे त्यावर हल्ला चढवत त्यास उचलून नेले.

वनविभाग व नातेवाईक यांच्या मदतीने शोध घेण्यात आला रविवारी सकाळी ६ वाजता मुलाचा मृतदेह शेजारील तुरीच्या पिकात आढळून आला. तो मृतदेह अर्धनग्न अवस्थेत होता. बिबट्या तेथून वनविभागाच्या कर्मचारी याची चाहूल लागताच पळून गेला. एकाच आठवड्यात दोन मुलांची हत्या झाल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.   

महाराष्ट्र व अहमदनगर जिल्ह्यातील ताज्या व महत्वाच्या बातम्या मिळवा, आजच जॉईन करण्यासाठी येथे क्लिक (@Sangamner Akole News) करा.

See:  Latest Entertainment News, Ahmednagar News, and  Latest Marathi News Live

Web Title: Pathardi bibatya attack on a child

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here