Home अकोले खिरविरे येथे माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक मेळाव्याचे आयोजन.

खिरविरे येथे माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक मेळाव्याचे आयोजन.

खिरविरे येथे माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक मेळाव्याचे आयोजन.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – गेले ते दिवस राहील्या त्या आठवणी. अशी पाखरे येती अन् स्मृती ठेवूनी जाती या उक्तीप्रमाणे सन १९७२ते २०१७चे माजी विद्यार्थि व शासकीय आश्रमशाळा खिरविरे यांचे संयुक्त विदयमाने शासकीय आश्रमशाळा खिरविरे(ता.अकोले ) येथे सोमवार दि. १५ ऑक्टोबर २०१८ रोजी सकाळी ९ते ११ या वेळेत माजी विद्यार्थी व शिक्षक,पालक मेळावा आयोजीत केला आहे.
सदर मेळाव्यात शासकीय आश्रमशाळेत शिकुन सध्या सेवेते कार्यरत असलेले पि.एस.आय, अभियंता, शिक्षक, प्राध्यापक, वकिल, डॉक्टर, पोलीस, सैनिक, मंत्रालयीन सेवेत असलेले, इयर इंडिया, रशिया दौरा, महानगरपालीका आदींचा समावेश आहे.
सदयस्थितीत शिकणाऱ्या मुलांना प्रेरणा देणे. आपणही शिकुन यांचे सारखे काही अप्रतिम करू शकतो अशी जिद्द निर्माण करणे. स्पर्धा परीक्षेचे महत्व समजणे, वेळचे भान ठेऊन परिस्थितीवर विजय मिळविणे. माजी विद्यार्थ्यांच्या आठवणींना उजाळा देणे. गुरूवर्यांचे ऋण व्यक्त करणे.विद्यार्थ्यांना व गुरूवर्यांना सुदाम्याची भेट देणे हा या मेळाव्याचा उद्देश असुन सदर मेळाव्यास उपस्थित राहुन विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करावा तसेच सेवेतील या माजी विदयार्थ्यांच्या बहुमोल मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा. असे सन १९७२ते २०१७ या दरम्यानचे माजी विद्यार्थि यांनी अव्हान केले आहे.

आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here