Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज ११ व्यक्ती कोरोना बाधित

Akole: अकोले तालुक्यात आज ११ व्यक्ती कोरोना बाधित

Akole Taluka Today 11 corona infected

अकोले | Akole: तालुक्यात आज रविवारी ११ करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या दोन दिवसांच्या तुलनेत आज बाधितांची संख्या कमी आल्याने तालुक्यात समाधान व्यक्त होत आहे.

आज सकाळी घेण्यात आलेल्या रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये तालुक्यातील नवलेवाडी येथील ६० वर्षीय पुरूष, विठा येथील ४५ वर्षीय महीला,निब्रळ येथील ४० वर्षीय पुरूष, चास पिंपळदरी येथील ४५ वर्षीय महीला, २४ वर्षीय तरुण, अशा ०५ व्यक्तीचा तर खाजगी प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात चितळवेढे येथील ४८ वर्षीय पुरूष अश्या ०६ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला तर सायंकाळी अहमदनगर येथील शासकीय प्रयोगशाळेतील आलेल्या अहवालात बेलापुर येथील ५४ वर्षीय महीला,ब्राम्हणवाडा येथील २८ वर्षीय तरुण, चैतन्यपुर ( ब्राम्हणवाडा)  येथील ४० वर्षीय पुरूष, लिंगदेव येथील ५८ वर्षीय पुरुष,४५ वर्षीय महीला अशा ०५ व्यक्ती सह आज दिवसभरात तालुक्यात एकुण ११ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.  तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ६६६ झाली आहे.

त्यापैकी ५३० व्यक्ती उपचार करुन बरे होऊन घरी गेले व ११ व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर १२५ व्यक्तीवर उपचार सुरु आहे.

पत्रकार: अल्ताप शेख अकोले 

Web Title: Akole Taluka Today 11 corona infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here