Home पाथर्डी Monika Rajale: आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण

Monika Rajale: आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण

Pathardi MLA Monika Rajale coronavirus infected

पाथर्डी: पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या आमदार मोनिका राजळे यांना करोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर नगर येथील निवासस्थानी उपचार सुरु आहेत.

विधानसभा अधिवेशनात सहभागी होण्यासाठी सर्व आमदारांना करोनाची चाचणी करून घेण्याचे आदेश काढण्यात आले आहे. त्यानुसार मोनिका राजळे यांनी शुक्रवारी पाथर्डी येथील करोना सेंटर येथे तपासणीसाठी स्त्राव देण्यात आले. शनिवारी सायंकाळी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे स्पष्ट झाले. राजळे या आपल्या पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथे घरीच होत्या. अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते नगर येथील रुग्णालयात दाखल झाल्या मात्र त्यांना कोणताही त्रास होत नसल्याने आपल्या घरीच उपचार घेण्यास सांगितले. सध्या त्या नगर येथील घरी उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आलेल्या गाडी चालक व स्वीय सहायक यांची देखील चाचणी करण्यात आली मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. त्यांना करोनाची लागण झाली असल्याने अधिवेशनात सहभागी होण्याची शक्याता कमी आहे.

Web Title: Pathardi MLA Monika Rajale coronavirus infected

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here