Home अकोले Akole: अकोले तालुक्यात आज दोन रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

Akole: अकोले तालुक्यात आज दोन रुग्णांची भर तर एकाचा मृत्यू

Akole taluka two new corona and one death

अकोले | Akole: अकोले तालुक्यात आज सोमवारी सायंकाळी दोन पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत. यामध्ये हिवरगाव आंबरे आणि मनोहरपूर या दोन गावांचा समावेश आहे. तसेच तालुक्यात आज आठवा करोनाचा मृत्यू झाला आहे. एकूण करोनाबाधितांची संख्या ३०२ इतकी झाली आहे.

अॅटीजेन अहवालात दोन यामध्ये हिवरगाव आंबरे येथील ३२ वर्षीय तरुण तर मनोहरपूर येथील ६४ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आला आहे.

दरम्यान हिवरगाव आंबरे येथील ६४ वर्षीय पुरुषाचा आज सकाळी करोनाने मृत्यू झाला आहे. तसेच खासगी प्रयोगशाळेत औरंगपूर येथील ४५ वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.  

Web Title: Akole taluka two new corona and one death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here