Home Suicide News अकोलेच्या विठे घाटात एका शिक्षकाची अंगातील शर्ट काढून त्या शर्टाने  गळफास घेत...

अकोलेच्या विठे घाटात एका शिक्षकाची अंगातील शर्ट काढून त्या शर्टाने  गळफास घेत आत्महत्या

Akole teacher took off his shirt and committed suicide by hanging

अकोले | Suicide:  सिन्नर येथील गुळवंच जि.प.शाळेतील शिक्षक विठ्ठल सुभाष सानप (वय ४१) यांनी अकोले तालुक्यातील विठे येथे घाटातील जंगलात अंगातील शर्ट काढून लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. बाबत राजूर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यू दाखल केला आहे.

या सिन्नर पोलीस स्टेशनला २८ नोव्हेंबर २०२१ रोजी मिसिंग दाखल असलेले सिन्नर तालुक्यातील गुळवंच येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक विठ्ठल सुभाष सानप (वय ४१) यांनी आपली मोटारसायकल अकोले तालुक्यातील विठे घटातील बस स्थानकाचे पुढील वळ णावर लावून जंगलात जाऊन अंगातील शर्ट काढून त्या शर्टाने लिंबाचे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.

याबाबत राजूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर नंबर ३३/२०२१ सी.आर.पी.सी १७४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास सपोनि नरेंद्र साबळे  यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे. का. कैलास नेहे करत आहेत.

Web Title: Akole teacher took off his shirt and committed suicide by hanging

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here