Home क्राईम संगमनेर: तरुणाचा खून प्रकरणी तिघांना आजन्म कारावास

संगमनेर: तरुणाचा खून प्रकरणी तिघांना आजन्म कारावास

Sangamner Three jailed for life in youth murder case 

संगमनेर | Murder Case: तालुक्यातील अंभोरे गावाच्या शिवारात ८ मार्च २०१७ ला संध्याकाळी साडे सात वाजेच्या सुमारास तरुणाचा खून झाल्याची घटना घडली होती.  २३ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणातील तिघा आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली आहे.

गोविंद साळपाटील खेमनर वय २४ रा. अंभोरे ता. संगमनेर, संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे, वय २५ रा. कोळवाडे ता. संगमनेर आणि विशाल हौशीराम खेमनर वय २३ रा. अंभोरे अशी आजन्म कारावासाची शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत.

स्वप्नील शिवाजी पुणे कर वय २३ रा. डिग्रस ता. संगमनेर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.  ८ मार्च २०१७ ला दुपारी झालेल्या  भांडणाचा जाब विचारण्यासाठी गोविंद खेमनर, संपत गागरे आणि विशाल खेमनर हे तिघे कारमधून गेले होते. त्यानंतर त्यांनी स्वप्नील पुणेकर यांना धरून गोविंद खेमनर याने त्यांच्या पोटात चाकूने वार केल्याने गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर संगमनेर उपविभागाचे उप विभागीय अधिकारी अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात दाखळ केले होते. यामध्ये २१ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी अभियोक्ता म्हणून वकील संजय वाकचौरे यांनी काम पाहिले.  

Web Title: Sangamner Three jailed for life in youth murder case 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here