Home अहमदनगर गंगामाई साखर कारखान्यांच्या प्रशासनामधील तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

गंगामाई साखर कारखान्यांच्या प्रशासनामधील तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणाची आत्महत्या

Young man commits suicide due to harassment of three

शेवगाव | Suicide: – गंगामाई साखर कारखान्यांच्या प्रशासनामधील तिघांच्या त्रासाला कंटाळून तरूणाने शेवगाव तहसील कार्यालयाच्या लोखंडी गेटसमोर झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. सोमनाथ ऊर्फ भाऊसाहेब सर्जेराव घनवट (29 रा. नजीक बाभूळगाव ता. शेवगाव) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे.  या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. अंबादास सर्जेराव घनवट यांनी फिर्याद दिली आहे.

विष्णू खेडेकर, अर्जुन मुखेकर, जगन्नथ रघुनाथ झाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींचे नावे आहेत.

मंगळवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या मुख्य लोखंडी गेट लगत असलेल्या लिंबाच्या झाडाला एका तरूणाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत काही नागरीकांच्या निदर्शनास आला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती समजताच शेवगाव पोलीस ठाण्यातील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तरूणाचा मृतदेह खाली उतरून घेतला. मृत तरूणाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला होता.

दरम्यान याप्रकरणी मयत भाऊसाहेब याच्या आत्महत्येप्रकरणी गंगामाई कारखान्यांच्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत भाऊसाहेब यांच्या शेताशेजारी गंगामाई साखर कारखाना आहे. कारखान्यांला ऊस घेऊन जाणारे वाहने त्यांच्या शेतामधून जात असल्याने पिकांची नासाडी होत आहे. तसेच कारखान्यांमुळे परिसरातील शेतातील विहीरीचे पाणी प्रदुषित होत असल्याने व पिकांवर कारखान्यांची राख उडून प्रदुषण होत असल्याची तक्रार भाऊसाहेब व फिर्यादी यांनी कारखाना प्रशासनाकडे केली होती.

कारखाना विरोधात वेळोवेळी केलेल्या तक्रारीचा रोष मनामध्ये धरून भाऊसाहेब व फिर्यादी यांच्याविरूद्ध जगन्नथ झाडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. कारखान्यांतील तिघांच्या त्रासाला कंटाळून भाऊसाहेब याने आत्महत्या केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास शेवगाव पोलीस करीत आहे.

Web Title: Young man commits suicide due to harassment of three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here