Home अकोले अकोले: विहिरीत क्रेन कोसळून तिघे ठार

अकोले: विहिरीत क्रेन कोसळून तिघे ठार

अकोले: विहिरीच्या खोदकामासाठी वापरण्यात येणाऱ्या क्रेनचा वायररोप तुटून क्रेन मजुरांसह विहिरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला. हि घटना अकोले तालुक्यातील देवठाण शिवारातील गहनीनाथनगर येथे घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून पुन्हा एकदा मजुरांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देवठाण हिवरगाव आंबरे रस्त्यावरील गहनीनाथनगर येथे रामहरी जोर्वेकर यांच्या विहिरीचे खोदकाम चालू होते. मजूर दुपारच्या जेवणानंतर क्रेनमध्ये बसून विहिरीत उतरत होते. यावेळी अचानक क्रेनचा वायररोप तुटला व क्रेन प्रचंड वेगाने विहिरीत कोसळली. विहिरीत खडक असल्याने क्रेनमध्ये असलेल्या बाळासाहेब दत्तात्रय शेळके वय ४० रा. देवठाण आणि गणेश दत्तू कदम वय ३० रा. हिवरगाव अंबरे या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर यामध्ये गंभीर जखमी झालेले नवनाथ गोविंद शिंदे वय ४० रा. वडगाव लांडगा यांना उपचारासाठी अकोले येथे आणत असताना वाटेतच त्यांचे निधन झाले. अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकंच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेने अकोले संगमनेर तालुक्यात शोककळा पसरली आहे. अकोले पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.     

Website Title: Akole the crane collapses and killed three

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here