अकोले: विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या
कळस: अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथील एका मुलाने शुक्रवारी दुपारी तीन वाजता राहत्या घराच्या छताला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत अकोले पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तेजस सीताराम बिबवे वय १७ असे या मुलाचे नाव आहे. त्याने दहावीत अनुउत्तीर्ण झाल्याच्या नैराश्यातून आत्महत्या केल्याचा संशय आहे. पोलीस पाटील गोपीनाथ ढगे यांनी याबाबत अकोले पोलीस ठाण्यात खबर दिली. पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार बी.बी. भोसले तपास करीत आहे.
Website Title: Akole Suicide by taking student’s lewd